प्रेम प्रकरणातून मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीचा केला खून, नंतर स्वत: रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

मुंबई तक

Crime News : मामाच्या मुलाने निर्घृणपणे आत्याच्या मुलीची हत्या केली, नंतर स्वत: रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घरात ठेवलेल्या विळ्याने तरुणीवर हल्ला करत तिचा खून केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीला संपवलं

point

स्वत:ने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

Crime News : झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली, नंतर स्वत: रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घरात ठेवलेल्या विळ्याने तरुणीवर हल्ला करत तिचा खून केला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करतायत.   

हे ही वाचा : 'मधुचंद्राच्या रात्री...,' नवविवाहितेची नको तीच अट, नवरदेवाला फुटला घाम, पुढं भयंकर घडलं

प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलाने आत्याच्या मुलीला संपवलं

घडलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे परिसरात प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून मामाच्या मुलाने तरुणीची हत्या केली. मृत तरुणीचं नाव खुशबू कुमारी असे होते, ती आपल्या मामाच्या घरी राहत होती. रविवारी रात्री तिचा मामाचा मुलगा बिट्टू कुमार सिंग तिच्याशी वाद घालत होता. 

स्वत:ने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन

संतप्त झालेल्या बिट्टूने घरात ठेवलेल्या विळ्याने खुशबूवर हल्ला चढवला आणि तिला ठार केले. नंतर मामाचा मुलगा बिट्टूने रेल्वेखाली उडी मारत जीवन संपवलं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. 

हे ही वाचा : कंस्ट्रक्शन सुरु असलेल्या बिल्डिंगमधून 5 वर्षीय मुलीचा रडण्याचा आवाज आला, स्थानिक लोकं पोहोचताच भयंकर दृश्य

दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, शस्त्र जप्त केले असून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलीस या प्रकरणाचा वादाच्या सर्व पैलूंचा कसून तपास करत आहेत. दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

हे वाचलं का?