Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यात उष्णता वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा अलर्ट
maharashtra weather : राज्यात काही विभागातील वातावरणात बदल घडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत वातावरण उष्ण आणि कोरडं राहिल अशी शक्यता उपस्थित केली, जाणून घेऊयात 17 फेब्रुवारी रोजी हवामान विभागातील अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात काही विभागातील वातावरणात बदल घडण्याची शक्यता
राज्यातील काही भागांत वातावरण उष्ण आणि कोरडं राहिल
Maharashtra Weather : राज्यात काही विभागातील वातावरणात बदल घडण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागांत हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांत वातावरण उष्ण आणि कोरडं राहिल अशी शक्यता उपस्थित केली, जाणून घेऊयात 17 फेब्रुवारी रोजी हवामान विभागातील अंदाज.
हे ही वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? तारीखही ठरली, फक्त औपचारिकता बाकी
कोकण :
कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई-ठाण्यात तापमान स्थिर राहील. आकाश निरभ्र राहील, तसेच नागरिकांनी दुपारच्या वेळी उन्हापासून सावध राहावे असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ ते अंशत: पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. घटमाथ्यावर आर्द्रता अधिक जाणवून उकाडा निर्माण होईल, तर मैदानी भागात कोरड्या हवामानाचा अंदाज राहील. तसेच उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे आणि उष्ण राहील.










