मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार? तारीखही ठरली, फक्त औपचारिकता बाकी
Sunetra Pawar : राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु झाली, तसेच दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला. दरम्यान 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली असता, त्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाचं नाव ठरलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली
अध्यक्षपदाच्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता

हे ही वाचा : ठाण्यात 16 वर्षीय मुलीनं इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारत संपवलं जीवन, नोटमध्ये लिहिलं 'कुटुंबावर ओझं..'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख ठरली आहे, अशातच 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची कार्यकारणी बैठक पार पडेल. त्याच बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित करण्यात येईल अशी दाट शक्यता असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा : सोलापूर हादरलं! वाहनाने दुचाकीला चिरडलं, तिघांचा जागीच करुण अंत
अध्यक्षपदाच्या चर्चेला लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत वक्तव्य केलं होते, याच मुद्द्याला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील असं वक्तव्य केलं होतं, पण 26 फेब्रुवारी रोजी अध्यक्षपदाबाबत चित्र स्पष्ट होईल.