वसई : आत्या रागावली म्हणून 15 वर्षीय भाच्याने केली हत्या, मित्राच्या मदतीने डोक्यात घातला बांबू; मृतदेह बेडखाली लपवण्याचा प्रयत्न

मुंबई तक

Vasai Murder News : वसईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या भाच्यानं आपल्या आत्याची हत्या केली आहे. ज्या भाच्याला घरात आसरा दिला तोच भाचा आत्याच्या जीवावर उठल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्या रागावल्याने 15 वर्षीय भाच्याने आत्याच्या डोक्यात बांबूने दोन वार केले. यामध्ये आत्याचा जागीच मृत्यू झाला. 15 फेबुवारी रोजी ही घटना घडली.  

ADVERTISEMENT

Vasai Murder News
Vasai Murder News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वसई : आत्या रागावली म्हणून १५ वर्षीय भाच्याने केली हत्या,

point

मित्राच्या मदतीने डोक्यात घातला बांबू

point

मृतदेह बेडखाली लपवण्याचा प्रयत्न

Vasai Murder News, Pravin Nalawade : वसईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे राहणाऱ्या भाच्यानं आपल्या आत्याची हत्या केली आहे. ज्या भाच्याला घरात आसरा दिला तोच भाचा आत्याच्या जीवावर उठल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्या रागावल्याने 15 वर्षीय भाच्याने आत्याच्या डोक्यात बांबूने दोन वार केले. यामध्ये आत्याचा जागीच मृत्यू झाला. 15 फेबुवारी रोजी ही घटना घडली.  

हे ही वाचा : अहिल्यानगर : पोटच्या मुलानेच आईला संपवलं, चाकू आणि अडकित्त्याच्या सहाय्याने हत्या, दोन तास मृतदेहाजवळच खेळत बसला

आत्या रागावल्याने केली हत्या

वसईच्या पश्चिमेला असलेल्या उमेळमान परिसरात ही घटना घडली. याठिकाणी आत्याने घरात 15 वर्षीय भाच्याला आसरा दिला होता. काही कारणावरुन आत्या आपल्या भाच्याला ओरडली. यामुळे त्याला म्हणून त्याला राग आला आणि मित्राच्या मदतीने बांबू घेतला आणि आत्याच्या डोक्यात दोन वार केले.  वार केल्यानंतर आत्याचा जागीच मृत्यू झाला आणि ही संपूर्ण घटना लपवण्यासाठी त्यांनी आत्याचा मृतदेह बेड मध्ये लपवून ठेवण्याची  शक्कल लढवली. 

अशी उघडकीस आली घटना

परंतु आत्याचा मृतदेह या दोघांना उचलला गेला नाही. त्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला . कोणाला संशय येऊ नये म्हणून जाताना घरातील सर्व दरवाजे आतून आणि बाहेरून लॉक केले आणि त्याने घराची चावी गटारामध्ये टाकली. 15 फेब्रुवारीला ही घटना घडली. 16 तारखेला दिवसभर आईने फोन उचलला नाही म्हणून तिच्या मुलीने नेमकं काय झालंय ते पाहण्यासाठी आपल्या भावाला पाठवले. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp