सकाळी शिवनेरीवर दर्शन घेतले दुपारी राजा शिवाजीचे पोस्टर लाँच केले, रितेश देशमुखचा नवा चित्रपट कधी येतोय?
Raja Shivaji : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्स कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे पोस्टर आज 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक गाथा, केवळ कथा नाहीतर एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान', आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी 'महाराष्ट्र दिना'दिवशी जगभर प्रदर्षित होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रितेश देशमुख यांच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाबाबत मोठी अपडेट
मराठीसह हिंदी कलाकारांचा समावेश
निर्मात्यांची नावे आली समोर
Raja Shivaji : भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा विलक्षण प्रवास आणि महाराजांचे व्यक्तिमत्व पुन्हा भव्य स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्स कंपनी निर्मित, 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे पोस्टर आज 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक गाथा, केवळ कथा नाहीतर एक वचन, एक स्वराज्य, एक संपूर्ण राष्ट्राचा अभिमान', आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी 'महाराष्ट्र दिना'दिवशी जगभर प्रदर्शित होणार आहे.
हे ही वाचा : क्रीडा विश्वावर शोककळा, सामना सुरु असतानाच अंपायरचा दुर्दैवी अंत, अनेक खेळाडू जखमी
पोस्टरमध्ये नेमकं काय?
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या पोस्टर्समध्ये अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत प्रभावशाली दिसत आहेत. त्यांच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, चेहऱ्यावरील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवरील उभे असलेले त्यांचे व्यक्तिमत्व शौर्याची प्रचिती देणारं आहे. पोस्टरमधील सुवर्ण अक्षरातील चित्रपटाचे नाव आणि प्रकाशयोजना या ऐतिहासिक गाथेच्या भव्यतेची साक्ष देते.
मराठीसह हिंदी कलाकारांचा समावेश
या चित्रपटातील भव्य दिव्य ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा, महाराजांचे शौर्य, त्याग आणि दूरदृष्टीला मनःपूर्वक वंदन करणारी सिनेमॅटिक कलाकृती आहे. अंगावर काटा आणणारे चित्रण या चित्रपटात दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटातील दिग्गज कलाकारांनी देखील काम केले आहे. या चित्रपटात अजय-अतुल यांच्या संगीताची जादू अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार संतोष सिवन हे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.










