डॉक्टरचे महिलेसोबत अनैतिक संबंध... शेवटी, डेन्टिस्ट पत्नीच्या हुशारीमुळे भररस्त्यात पतीचं डर्टी सीक्रेट उघडकीस!
शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणं महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित डॉक्टर ज्या पत्नीपासून आपलं प्रेमसंबंध लपवून ठेवलं, त्याच पत्नीने आपल्या पतीचं डर्टी सिक्रेट भररस्त्यात उघडकीस आणलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉक्टरचे भलत्याच महिलेसोबत अनैतिक संबंध...
डेन्टिस्ट पत्नीच्या हुशारीमुळे भररस्त्यात पतीचं डर्टी सीक्रेट उघडकीस!
Crime News: सध्याच्या काळात, विवाहबाह्य संबंधाची बरीच धक्कादायक प्रकरणे समोर येत असल्याचं पाहायला मिळतं. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून असंच एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला महिलेसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणं महागात पडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित डॉक्टर ज्या पत्नीपासून आपलं प्रेमसंबंध लपवून ठेवलं, त्याच पत्नीने आपल्या पतीचं डर्टी सिक्रेट भररस्त्यात उघडकीस आणलं.
डेन्टिस्ट पत्नीची हुशारी...
या प्रकरणात रीवा येथील एका प्रसिद्ध रुग्णालयाचे मालक आणि डॉक्टर यांचा समावेश आहे. वृत्तानुसार, डॉक्टरच्या संशयास्पद हालचालींमुळे काही काळापासून त्याच्या पत्नीला आपल्या पतीवर संशय होता. त्याची पत्नी स्वतः दंतचिकित्सक म्हणजेच डेन्टिस्ट असल्याची माहिती आहे. बुधवारी, डॉक्टर त्याच्या प्रेयसीसोबत आपल्या आलिशान कारमधून शहराच्या परिसरातून जात होती. त्यावेळी त्याची पत्नी, गुप्तहेरासारखी पतीचा पाठलाग करत होती आणि रस्त्याच्या मधोमध तिने त्याची कार थांबवली.
हे ही वाचा: राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा?
पतीच्या मैत्रिणीला केस धरून ओढलं अन्...
गाडीचा दरवाजा उघडताच, आतलं दृश्य पाहून पत्नीचा संयम सुटला. आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नीचा राग शिगेला पोहोचला. अजिबात संकोच न करता तिने त्या पतीच्या प्रेयसीला गाडीतून बाहेर काढलं आणि तिचे केस धरून तिला रस्त्यावर ओढून आणलं. आपली प्रतिष्ठा वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरने हस्तक्षेप करून त्याच्या महिला मैत्रिणीला त्याच्या पत्नीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा: "डॉक्टरचा नर्ससोबतचा 'तो' व्हिडीओ..." रुग्णालयातील स्टाफने रचला मोठा कट अन् तब्बल 90 लाखांची मागणी
भररस्त्यातील संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामा स्थानिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. आता, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.










