विवाहबाह्यसंबंध असल्याचा आरोप, आईनेच पोटच्या दोन मुलांची केली हत्या, आईसह मावशीला अटक
Crime News : आईने अनैतिक प्रेमसंबंधातून आपल्या दोन मुलांचा जीव घेतला. संबंधित घटनेनं आई आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिलेनं उंदीर मारण्याचे औषध देऊन मुलांचा जीव घेतला,असा आरोप आहे. संशय येऊ नये म्हणून दोन्ही मुलांना 15 दिवसांचे अंतर ठेवून मारण्यात आले, दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन्ही मुलांच्या अचानक मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का
आईकडून गुन्ह्याचा कबुलीनामा

हे ही वाचा : पुरुषासारखी चाल आणि बुटांमुळे उलगडलं सत्य, मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यातून बुरखा परिधान करणारा पुरुष ताब्यात
दोन्ही मुलांच्या अचानक मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का
भटिंडा पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितलं की, एका गावात सुखप्रीत कौर (वय 8) या मुलीचा मृत्यू झाला. नंतर पंधरा दिवसानंतर शुक्रवारी 6 वर्षीय फतेहवीरचाही मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या अचानक मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला होता. आईने मुलांच्या झालेल्या मृत्यूचे कारण सांगितलं, हा मृत्यू आजारपणामुळे झाल्याची माहिती आईने दिली.
आईकडून गुन्ह्याचा कबुलीनामा
दोन्ही मुलांच्या संशयास्पद मृत्यूमुळे गावकऱ्यांना संशय आला, त्यांनी शनिवारी सकाळी फूल पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक गावात आले आणि त्यांनी आरोपी आई जस्सी गौरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने पोलिसांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला.
हे ही वाचा : क्रीडा विश्वावर शोककळा, सामना सुरु असतानाच अंपायरचा दुर्दैवी अंत, अनेक खेळाडू जखमी
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, जस्सी कौरती बहीण मोटो कौर आणि एक पुरुष लक्खी सिंग हे देखील या कटात सहभागी होते. मुलांच्या हत्येमागे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगितले गेले. या प्रकरणात आईसह मावशीला देखील अटक करण्यात आली, तर दुसऱ्या संशयिताचा शोध सुरु आहे.