50 वर्षीय अनिलचे मेहुण्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध! नाराज प्रेयसीला मनवण्यासाठी गेला पण नकार मिळताच...
अनिल नावाच्या एक मध्यमवयीन पुरूषाचे त्याच्या मेहुण्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. एका गोष्टीमुळे महिला नाराज झाली आणि ती आपल्या सासरी निघून गेली. अनिल तिला मनवण्यासाठी गेला पण महिलेने तिच्या प्रियकराचं काहीच ऐकलं नाही. शेवटी, वादातून भयानक घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
50 वर्षीय अनिलचे मेहुण्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध!
नाराज प्रेयसीला मनवण्यासाठी गेला पण नकार मिळताच...
Crime News: उत्तर प्रदेशातील इटावा येथून प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वृत्तानुसार, अनिल नावाच्या एक मध्यमवयीन पुरूषाचे त्याच्या मेहुण्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. गेल्या दहा वर्षांपासून ते एकत्र राहत होते. मात्र दोन महिन्यांपूर्वी, एका गोष्टीमुळे महिला नाराज झाली आणि ती आपल्या सासरी निघून गेली. अनिल तिला मनवण्यासाठी गेला पण महिलेने तिच्या प्रियकराचं काहीच ऐकलं नाही. त्यानंतर, शेवटी वैतागलेल्या अनिलने पिस्तूलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मृताच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, ही आत्महत्या नसून हत्या आहे. सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
मेहुण्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध
संबंधित घटना बकेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हालुपुरा गावात घडली. येथील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय अनिलचे त्याच्या मेहुण्याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळताच, अनिलच्या मेहुण्याने तिला घराबाहेर काढलं आणि ती तिच्या माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर, महिलेच्या माहेरी अनिलचं सतत येणं-जाणं सुरू झालं आणि त्याने प्रेयसीसोबत राहण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: सध्या घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय? प्रेमानंद महाजारांनी दिलं उत्तर...
पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
दोन वर्षांपूर्वीच अनिलच्या पत्नीचा आगीत जळून मृत्यू झाला होता आणि तो जवळपास 10 वर्षांपासून तिच्या प्रेयसीसोबत राहत होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर, महिला तिच्या प्रियकराला म्हणजेच अनिलला सोडून आपल्या सासरी निघून गेली. तेव्हा अनिल तिला मनवण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. मात्र, महिलेने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. दरम्यान, अनिल त्याच्या प्रेयसीला मारहाण करत असल्याचा देखील आरोप आहे. जेव्हा महिलेने अनिलसोबत जाण्यास नकार दिला आणि तेव्हा अनिलने पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
हे ही वाचा: "ज्या कठीण प्रसंगात मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा डोळ्यासमोर..", सुनेत्रा पवार भाषणात काय म्हणाल्या?
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि कुटुंबातील लोक गोळा झाले. त्यानंतर, तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना आत्महत्या असल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.










