नागपूर : पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्राला अत्याचार करायला भाग पाडलं

योगेश पांडे

Nagpur Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष उके याला 17 वर्षीय पीडित मुलाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने बदला घेण्याचे ठरवले. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी पीडित मुलगा मेडिकल चौक परिसरात आपल्या तीन मित्रांची वाट पाहत थांबला होता. त्याचवेळी सुभाष कारमधून तिथे आला. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने पीडित मुलगा आणि त्याच्या मित्रांना गाडीत बसवले आणि त्यांना अंभोरा येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेला.

ADVERTISEMENT

Nagpur Crime News
Nagpur Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय

point

वऱ्याने अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्राला अत्याचार करायला भाग पाडलं

Nagpur Crime News : नागपूर: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करवून घेतल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार सुभाष उके (वय 40, रा. इंदिरा नगर, जाटतरोडी) याला अटक केली आहे. सुभाष हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष उके याला 17 वर्षीय पीडित मुलाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने बदला घेण्याचे ठरवले. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी पीडित मुलगा मेडिकल चौक परिसरात आपल्या तीन मित्रांची वाट पाहत थांबला होता. त्याचवेळी सुभाष कारमधून तिथे आला. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने पीडित मुलगा आणि त्याच्या मित्रांना गाडीत बसवले आणि त्यांना अंभोरा येथील एका निर्जनस्थळी घेऊन गेला.

हेही वाचा : भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं

निर्जन ठिकाणी आल्यावर घाबरलेल्या पीडित मुलाने सुभाषला तिथे आणण्याचे कारण विचारले. तेव्हा, "तुझे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत," असे म्हणत सुभाषने पीडित मुलावर चाकूने हल्ला केला आणि त्याला जखमी केले. यानंतर, त्याने पीडित मुलाच्याच एका मित्राला चाकूचा धाक दाखवून पीडित मुलासोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. आरोपीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि कोणाला सांगितल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp