'बाबा मला वाचवा..' हल्लेखारोंच्या तावडीतून मुलाला वाचवायला गेले; मुलासमोरच वडिलांवर झाडली गोळी
Crime News : आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका वडिलांचा मुलाच्या डोळ्यादेखत हल्लेखोरांनी हत्या केली आहे. 10 वीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला काही मुले मारहाण करत असल्याची माहिती वडिलांना मिळाली. मात्र आपल्या मुलाला वादातून सोडवत असताना गुंडांनी त्यांच्या छातीत गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'बाबा मला वाचवा..' हल्लेखारोंच्या तावडीतून मुलाला वाचवायला गेले
मुलासमोरच वडिलांवर झाडली गोळी
Crime News : आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या एका वडिलांचा मुलाच्या डोळ्यादेखत हल्लेखोरांनी हत्या केली आहे. 10 वीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला काही मुले मारहाण करत असल्याची माहिती वडिलांना मिळाली. मात्र आपल्या मुलाला वादातून सोडवत असताना गुंडांनी त्यांच्या छातीत गोळी झाडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दिल्लीतील ही घटना आहे. मोहम्मद उमरदीन असं 35 वर्षीय मृच वडिलांचं नाव आहे.
'बाबा मला वाचवा'
उमरदीन यांचा 15 वर्षांचा मुलगा तहजीम मंगळवारी संध्याकाळी ट्यूशनवरून घरी परतत होता. वाटेत त्याने पाहिले की काही मुले त्याच्या मित्रांना मारहाण करत आहेत. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्या मुलांनी तहजीमलाही पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या तहजीमने तातडीने वडिलांना फोन करून 'बाबा मला वाचवा' अशी विनवणी केली. मुलाचा आक्रोश ऐकून उमरदीन आपल्या पत्नीसह तातडीने घटनास्थळी पोहोचले.
छातीवर गोळी झाडून हत्या
उमरदीन तिथे पोहोचले तेव्हा हल्लेखोर अधिकच संतप्त झाले. आरोपींपैकी एकाने पिस्तूल काढून आधी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर थेट उमरदीन यांच्या छातीवर गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमरदीन यांना तातडीने गुरु तेग बहादूर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून उमरदीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार मुली आणि मुलगा तहजीम असा परिवार आहे.










