मित्राच्या नावाने विमा काढला, स्वत:च नॉमिनी बनला, नंतर दारु पाजून मित्राला संपवलं; 'असा' रचला कट
Crime News : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच एका मित्राच्या नावावर असलेल्या तब्बल २ कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम हडपण्यासाठी दोन तरुणांनी त्याच्या हत्येचा कट रचला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तेलंगणातील भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील ही घटना आहे. विशेष म्हणजे एक आरोपी खाजगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मित्राच्या नावाने विमा काढला, स्वत:च नॉमिनी बनला
नंतर दारु पाजून मित्राला संपवलं; 'असा' रचला कट
Crime News : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच एका मित्राच्या नावावर असलेल्या तब्बल २ कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम हडपण्यासाठी दोन तरुणांनी त्याच्या हत्येचा कट रचला. याप्रकरणी पोलिसांनी कट्टा साई दीपक आणि कोंडा भानु प्रकाश या दोन आरोपींना अटक केली आहे. तेलंगणातील भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील ही घटना आहे. विशेष म्हणजे एक आरोपी खाजगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे.
हे ही वाचा : नागपूर : पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्राला अत्याचार करायला भाग पाडलं
मावशीला घातपाताचा संशय
14 फेब्रुवारीच्या रात्री मोथे गावाजवळ कट्टा यशवंत नावाचा तरुण रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. यशवंतला तातडीने भद्राचलमच्या शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने खम्मम येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, यशवंतच्या मावशीने हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
दारु पाजून केली हत्या
पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी नोव्हेंबर 2025 मध्ये यशवंतच्या नावाने एक मोठी विमा पॉलिसी काढली होती, ज्यामध्ये साई दीपकला नॉमिनी (वारसदार) करण्यात आले होते. नॉमिनी होण्यासाठी दीपकने स्वतःला यशवंतचा नातेवाईक असल्याचे भासवले होते. 14 फेब्रुवारीच्या रात्री या दोघांनी कटानुसार यशवंतला मोथे गावाजवळ नेले, तिथे त्याला भरपूर दारू पाजली आणि तो स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करत असताना मागून लोहेरी रॉडने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केले.










