तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करुन बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याचं कृत्य; बहिणदेखील सामील असल्याचा आरोप

मुंबई तक

Crime News : एका तृतीयपंथीय व्यक्तीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर बलात्कार, आर्थिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने सोबत राहण्याचे अमिष दाखवून पीडित तृतीयपंथीय व्यक्तीचे लिंग परिवर्तन करण्यास भाग पाडले. मात्र आता आरोपीचे मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्याने पीडित तृतीयपंथीय व्यक्तीला सोडून दिले आहे. यामुळे नाराज पीडितेने पोलिस स्टेशन गाठले. नात्याला काळिमा फासणारी ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तृतीयपंथीयाचे लिंग परिवर्तन करुन बलात्कार

point

बहिणीच्या नवऱ्याचं कृत्य

point

बहिणदेखील सामील असल्याचा आरोप

Crime News : एका तृतीयपंथीय व्यक्तीने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावर बलात्कार, आर्थिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. आरोपीने सोबत राहण्याचे अमिष दाखवून पीडित तृतीयपंथीय व्यक्तीचे लिंग परिवर्तन करण्यास भाग पाडले. मात्र आता आरोपीचे मेहुणीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्याने पीडित तृतीयपंथीय व्यक्तीला सोडून दिले आहे. यामुळे नाराज पीडितेने पोलिस स्टेशन गाठले. नात्याला काळिमा फासणारी ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

हे ही वाचा : केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार; मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप

आयुष्यभर सोबत राहण्याचे आश्वासन

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, 2018 मध्ये वडिलांच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर नगरपालिकेत नोकरी मिळाली. याच काळात तिची ओळख आरोपीशी झाली. आरोपी मटणाचे दुकान चालवतो आणि तो चार मुलांचा बाप आहे. आरोपीने लग्नाचे आणि आयुष्यभर सोबत राहण्याचे खोटे आश्वासन देऊन पीडितेवर अत्याचार केले. इतकेच नाही तर, मार्च 2023 मध्ये दिल्लीला नेऊन सुमारे 7 लाख रुपये खर्च करून तिचे लिंग परिवर्तन  घडवून आणले.

पीडितेचे आर्थिक शोषण

आर्थिक शोषणाबाबत माहिती देताना पीडितेने सांगितले की, गेल्या अडीच ते तीन वर्षांत आरोपी आणि त्याच्या पत्नीने मिळून तिचे वेतन आणि 'बधाई' मधून मिळणारे सर्व पैसे हडप केले. घरखर्च आणि इतर गरजांच्या नावाखाली आतापर्यंत सुमारे 20 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने आरोपीने लाटल्याचा आरोप आहे. पीडितेने या आर्थिक व्यवहारांचे काही पुरावे देखील पोलिसांकडे सुपूर्द केले असून, आरोपीने केवळ पैशांसाठी तिचा वापर केल्याचे तिचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp