दाजीला मारायचे होते, रात्रीच्या अंधारात चुकून बहिणीलाच संपवले; हादरवून टाकणारे हत्याकांड

मुंबई तक

Crime News : एका मेहुणीने आपल्या दाजीला मारण्याचा कट रचला होता. मात्र दाजीला मारण्याच्या नादात तिने आपल्या बहिणीलाच संपवले आहे. रात्रीच्या अंधारात आरोपींनी एका महिलेची गोळी घालून हत्या केली आहे. शरीफा खातून असे मृत महिलेचे नाव असून, ती एहतेशाम हुसैन यांची पत्नी होती. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर पतीची हत्या करण्याच्या उद्देशाने आले होते, मात्र अंधारामुळे ओळख पटवण्यात चूक झाल्याने पत्नी या जीवघेण्या हल्ल्याची बळी ठरली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दाजीला मारायचे होते, रात्रीच्या अंधारात बहिणीलाच संपवले

point

हादरवून टाकणारे हत्याकांड

Crime News : करायला गेले एक अन् झालं भलतंच असे अनेक प्रकार आपल्या अवतीभोवती घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मेहुणीने आपल्या दाजीला मारण्याचा कट रचला होता. मात्र दाजीला मारण्याच्या नादात तिने आपल्या बहिणीलाच संपवले आहे. रात्रीच्या अंधारात आरोपींनी एका महिलेची गोळी घालून हत्या केली आहे. शरीफा खातून असे मृत महिलेचे नाव असून, ती एहतेशाम हुसैन यांची पत्नी होती. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर पतीची हत्या करण्याच्या उद्देशाने आले होते, मात्र अंधारामुळे ओळख पटवण्यात चूक झाल्याने पत्नी या जीवघेण्या हल्ल्याची बळी ठरली. बिहारच्या कटिहार परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : नागपूर : पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्राला अत्याचार करायला भाग पाडलं

संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण

घटनेच्या वेळी पती-पत्नी वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. गुन्हेगारांनी घरात प्रवेश केला आणि बेडवर झोपलेल्या शरीफा खातून यांनाच एहतेशाम समजून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागताच शरीफा यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज आणि घरातील सदस्यांचा आरडाओरडा ऐकून गुन्हेगार हादरले आणि घाईघाईत आपली पिस्तूल घटनास्थळीच सोडून तिथून फरार झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेमागे मेहुणी आणि साडूचा हात

मृत महिलेचे पती एहतेशाम हुसैन यांनी हा एक मोठा कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक वादातून त्यांना यापूर्वीही एका जुन्या प्रकरणात अडकवण्यात आले होते. या हल्ल्यामागे त्यांची मेहुणी आणि साडू यांचा हात असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला असून रंजिशपोटीच हा कट रचला गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp