'आईचे अनैतिक संबंध..' मुलीने दिली पोलिसांत तक्रार, नंतर झाला वडिलांच्या हत्येचा खुलासा
अनैतिक प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आईला ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईचे अनैतिक संबंध..
मुलीने दिली पोलिसात तक्रार
नंतर झाला वडिलांच्या हत्येचा खुलासा
Crime News : बायकोने प्रियकरासोबत मिळून थंड डोक्याने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर तिने पुरावे लपवण्यासाठी पतीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. लोखंडी गज व तलवारीने मृतदेहाचे तुकडे करून जमिनीत खड्डा खणून पुरले. ही घटना 10 एप्रिलची असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी (11 एप्रिल) मृताच्या मुलीने पोलिसांकडे वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार केली आणि आई व तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला, तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपींची कडक चौकशी केली असता संपूर्ण कट समोर आला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि प्रियकराला अटक केली आहे.
अनैतिक संबंधाची नवऱ्याला माहिती
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भानपुरा तालुक्यात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी धापूबाई आणि तिचा 40 वर्षीय प्रियकर पंकज चौधरी यांचे दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते. महिलेचा पती धनराजला जेव्हा आपल्या बायकोच्या या अनैतिक संबंधांबद्दल ही माहिती समजली, तेव्हापासून नवरा-बायकोमध्ये वारंवार वाद होऊ लागले. यामुळेच तिने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. 10 एप्रिलच्या रात्री धनराजची हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी पंकजने जेसीबी मागवून खड्डा खणला. त्याने आधी धनराजचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु जेव्हा मृतदेह पूर्णपणे जळाला नाही, तेव्हा मृतदेहाचे तुकडे करून खड्ड्यात टाकून मातीने झाकून टाकले.
हे ही वाचा : अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार, चुलत भावासह गावातील चौघांचा समावेश; 'असं' बाहेर आलं प्रकरण
मुलीने नोंदवली तक्रार
धनराज शुक्रवारी रात्री घराबाहेर पडला होता आणि पंकजच्या गाडीतून एका कार्यक्रमाला गेला होता. त्यानंतर त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. मृताच्या मुलीने शनिवारी वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मुलीने आपली आई धापूबाई आणि तिचा प्रियकर पंकज यांच्यावर संशय व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी धापूबाई आणि पंकज यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला दोघेही पोलिसांची दिशाभूल करत होते, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
हे ही वाचा : 85 वर्षीय वृद्धाने डॉक्टरांची कार पेटवून दिली, स्वत: देखील भाजला गेला, परिसरात भीतीचे वातावरण
जेसीबीने खड्डा खोदून पुरले मृतदेहाचे तुकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 10 एप्रिलच्या रात्री तलवारीने वार करून धनराजला ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले गेले. तो जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यातही अपयश आल्यावर जेसीबी मशीन बोलावून शेतात खड्डा खणून मृतदेहाचे तुकडे पुरले. एसडीओपी विजय कुमार यादव यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. यामध्ये इतर आरोपी सामील असतील तर त्यांनाही अटक केली जाईल. प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी पंकज चौधरी आणि धापूबाई यांनी दाखवल्याप्रमाणे खड्ड्यातून मृतदेहाचे तुकडे जप्त केले आहेत. घटनास्थळावरून दोन तलवारी आणि एक सब्बल जप्त करण्यात आली आहे.









