ब्लॅकमेल करुन 15 लाख अन् दागिने उकळले, नंतर तरुणाीला देहविक्रय करण्यास भाग पाडले; मैत्रिणीने कसं केलं आयुष्याचं वाटोळं?
Crime News : सोशल मीडियावरील मैत्रीमुळे एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. धक्कादायक म्हणजे तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी दुसरी तिसरी कोणी नसून तिची जवळची मैत्रीणच आहे. या मैत्रिणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने तरुणीला फसवले. तिला अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करुन लाखो रुपये उकळले आणि शेवटी देहविक्रय करण्यास भाग पाडले. हादरवून टाकणारी ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ब्लॅकमेल करुन 15 लाख अन् दागिने उकळले, नंतर तरुणाीला देहविक्रय करण्यास भाग पाडले
मैत्रिणीने कसं केलं आयुष्याचं वाटोळं?
Crime News : नेहमी चांगल्या लोकांशी मैत्री करावी असं आपल्याला सांगितलं जातं. चुकीच्या व्यक्तींसोबत केलेली मैत्री महागात पडू शकते. विशेषत: सोशल मीडियावर तर अनोळखी लोकांपासून सावध रहायला हवे. अशा लोकांशी केलेली मैत्री जीवघेणी ठरु शकते. सोशल मीडियावरील अशाच मैत्रीमुळे एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. धक्कादायक म्हणजे तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी दुसरी तिसरी कोणी नसून तिची मैत्रीणच आहे. या मैत्रिणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने तरुणीला फसवले. तिला अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करुन लाखो रुपये उकळले आणि शेवटी देहविक्रय करण्यास भाग पाडले. हादरवून टाकणारी ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.
हे ही वाचा : नागपूर : पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने अल्पवयीन मुलावर त्याच्या मित्राला अत्याचार करायला भाग पाडलं
15 लाख रुपये उकळले
उत्तर प्रदेशातील कानपुरमधील ही घटना आहे. 2023 मध्ये कल्याणपूर भागात राहणाऱ्या पीडित तरुणीला इंस्टाग्रामवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. श्रद्धा कटियार नावाच्या या मैत्रिणीने हळूहळू जवळीक वाढवून पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चार फेक इंस्टाग्राम आयडीवरुन पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात झाली. 'तुझे खाजगी व्हिडीओ आमच्याकडे आहेत, ते नातेवाईकांना पाठवू,' अशी भीती घालून गेल्या दोन वर्षांत पीडितेकडून सुमारे 15 लाख रुपये आणि दागिने उकळण्यात आले.
देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलले
पीडितेचे पैसे आणि दागिने संपल्यानंतरही आरोपींची हाव कमी झाली नाही. श्रद्धाने तिला ब्लॅकमेल करून सक्तीने देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलले. श्रद्धा स्वतः हॉटेलमध्ये ग्राहकांशी संपर्क साधून पीडितेची बुकिंग करायची आणि तिथे चुकीच्या कामातून मिळणारे सर्व पैसे स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घ्यायची. या छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली, त्यानंतर कानपूर क्राईम ब्रँचने तपासचक्र फिरवून या कृत्याचा पर्दाफाश केला.










