रात्री सासू-सुनेचं भांडण, सकाळी सासू बेडवर मृतावस्थेत आढळली; मुलाने पोलिसांना काय सांगितलं?
Crime News : उत्तरप्रदेशातील अयोध्या या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (18 फेब्रुवारी) रात्री घरी कोणी नसताना सासू आणि सूनेमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सासूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रात्री सासू-सुनेचं भांडण
सकाळी सासू बेडवर मृतावस्थेत आढळली
Crime News : उत्तरप्रदेशातील अयोध्या या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (18 फेब्रुवारी) रात्री घरी कोणी नसताना सासू आणि सूनेमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सासूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
सासू-सुनेत सतत खटके
मिळालेल्या माहितीनुसार, गंगादेई (55) यांना स्वतःचा मुलगा नसल्याने त्यांनी आपल्या पुतण्याला दत्तक घेतले होते. वर्षभरापूर्वीच या दत्तक मुलाचे लग्न झाले होते, मात्र तेव्हापासून सासू आणि सुनेमध्ये सतत खटके उडत होते. ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, मंगळवारी हा वाद विकोपाला गेला होता आणि वाद मिटवण्यासाठी सुनेच्या माहेरची मंडळीही गावात आली होती.
रात्री भांडण अन् सकाळी मृत्यू
घटनेच्या रात्री गंगादेई यांचे पती शेतावर राखण करण्यासाठी गेले होते, तर मुलगा एका कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता. घरात सासू आणि सून दोघीच होत्या. सकाळी मुलगा घरी परतला असता बराच वेळ दरवाजा उघडला नाही. अखेर घराच्या पाठीमागील तिरपाल फाडून तो आत शिरला, तेव्हा त्याला गंगादेई अंथरुणावर मृतावस्थेत आढळल्या. पत्नीच्या मृत्यूबाबत पती सोमई यांनी संशय व्यक्त केला आहे.