खंडणी प्रकरणात सह-तक्रारदार असलेल्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या

मुंबई तक

Crime News : पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि न्यायालयीन साक्षीमुळे झाला असल्याची शक्यता आहे. सरपंच हे एका खंडणी प्रकरणात सह-तक्रारदार होते. या गोळीबारात जर्मन सिंग नावाचा व्यक्तीही जखमी झाला आहे. लांडा हरीके गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून, ती त्यांच्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला असल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खंडणी प्रकरणात सह-तक्रारदार असलेल्या सरपंचाची गोळ्या घालून हत्या

point

जुन्या वैमनस्यातून आणि न्यायालयीन साक्षीमुळे मर्डर झाल्याची शक्यता

Crime News : पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात सरपंच हरबिंदर संधू यांच्या हत्येने राज्यातील वाढत्या गँगवॉर आणि संघटित गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आणला आहे. हल्लेखोरांनी या घटनेत कथितपणे एके-सीरिज असॉल्ट रायफल आणि 9 एमएम पिस्तूलाचा वापर केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. जानेवारी महिन्यात वाल्टोहा येथील सरपंच आणि लकी ओबेरॉय यांच्या हत्येनंतरची ही तिसरी मोठी घटना मानली जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला जुन्या वैमनस्यातून आणि न्यायालयीन साक्षीमुळे झाला असल्याची शक्यता आहे. सरपंच हे एका खंडणी प्रकरणात सह-तक्रारदार होते. या गोळीबारात जर्मन सिंग नावाचा व्यक्तीही जखमी झाला आहे. लांडा हरीके गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून, ती त्यांच्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला असल्याचे म्हटले आहे.

सरपंचांच्या हत्येत एके-सीरिज असॉल्ट रायफलचा वापर झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या हल्ल्याची पद्धत 2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येशी तुलना केली जात आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. गँगस्टर लांडा हरीकेने व्हायरल पोस्टमध्ये हा केवळ ‘ट्रेलर’ असल्याचा दावा करत अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. दरम्यान, निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून डीएसपी पट्टी जगबीर सिंग आणि एसएचओ सरहाली गुरविंदर सिंग यांना निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा : डॉक्टरचे महिलेसोबत अनैतिक संबंध... शेवटी, डेन्टिस्ट पत्नीच्या हुशारीमुळे भररस्त्यात पतीचं डर्टी सीक्रेट उघडकीस!

हे वाचलं का?

    follow whatsapp