NCP : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात सुप्रिया सुळेंमुळे पेच -शिंदेंच्या नेत्याचं विधान

मुंबई तक

Merger of Congress-NCP : शिवसेना नेता संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल एक मोठं विधान केले आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संजय निरुपम
शरद पवार सुप्रिया सुळे आणि संजय निरुपम
social share
google news

Sanjay Nirupam on Sharad Pawar : भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील. यातील काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असे विधान शरद पवार यांनी केले. त्यांच्या या विधानावर आता संजय निरुपम यांनी टीका केली आहे. (Sanjay Nirupam On Sharad Pawar Statement about NCP merge with congress)

संजय निरुपम काय म्हणाले?

"माननीय शरद पवार हे बऱ्याच काळापासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबद्दल विचार करत आहेत. काँग्रेसने त्यांना अनेकवेळा प्रस्ताव दिला होता. पण, पेच निर्माण झाला, तो मुलीमुळे (सुप्रिया सुळे)."

"त्यांनी (शरद पवार) मुलीला (सुप्रिया सुळे) महाराष्ट्रातील काँग्रेसचं नेतृत्व सोपवण्याचा आग्रह केला होता, जो काँग्रेसने फेटाळून लावला होता. आता परिस्थिती बदलली आहे. त्यांचा पक्ष विखुरला गेला आहे."

हेही वाचा >> बारामती कोणत्या पवारांकडे जाणार? घटलेल्या टक्क्याने वाढवली चिंता

"त्यांच्या आत्ताच्या विधानाचा अर्थ हाच आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटू शकते. कदाचित तशी शंका त्यांना आहे. असं नाही झालं, तरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय त्यांच्या कोणताही पर्याय नाही."

हे वाचलं का?

    follow whatsapp