Baramati Lok Sabha : बारामती कोणत्या पवारांकडे जाणार? घटलेल्या टक्क्याने वाढवली चिंता

मुंबई तक

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि अजित पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

Baramati Lok Sabha election 2024 : महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर बारामतीत कुणाचा खासदार असणार, याची उत्सुकता असून, निकाला आधी घटलेल्या मतदानाने दोन्ही उमेदवारांचं टेन्शन वाढवलं आहे. (Lowest voter turnout in Baramati lok sabha election)

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले आहे. घसरलेल्या टक्क्याने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची चिंता वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट... बारामतीत वर्चस्व कुणाचं?

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट बाहेर पडला. या गटाला मूळ राष्ट्रवादी म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट आहे. दरम्यान, पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?

ही जागा जिंकणे अजित पवारांसाठी अपरिहार्य बनल्याचे सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे शरद पवारांचे बारामतीतील वर्चस्व किती हे ही या निवडणूक दिसून येणार आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले ते पहा 

बारामती विधानसभा - ६४.५० टक्के
भोर - ५८.५२ टक्के
दौंड - ५७.८० टक्के
इंदापूर -६२.५० टक्के
खडकवासला - ५० टक्के
पुरंदर - ४८ टक्के

ADVERTISEMENT

२०१९ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात ६१.५४ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.०७ टक्केच मतदान झाले आहे. म्हणजेच गेल्या मतदानाच्या तुलनेत ५.४७ टक्क्यांनी मतदान घट झाली आहे.

ADVERTISEMENT

 

बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला आणि पुरंदर या दोन विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे. या मतदारसंघात भीमराव तपकीर हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे याच मतदारसंघात केवळ ४८ टक्के मतदान झाले आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार कोणत्या गटाकडे गेला, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत.

हेही वाचा >> भाजपला झटका! अपक्ष आमदारांनी सोडली साथ, काँग्रेसला दिला पाठिंबा 

इंदापूर विधानसभा मतदारसंघात ६२.५० टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या मतदार संघातून कुणाच्या पारड्यात मते गेली हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

संग्राम थोपटेंचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा 

भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार आहेत. संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला होता. भोरमध्ये ५८.५२ टक्के मतदान झालेले आहे. भोरमध्ये थोपटे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्याच्या अफवाही उडाल्या होत्या. या मतदारसंघातील मतदारांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

राहुल कूल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या पारड्यात किती मते पडणार? हाही कुतूहलाचा विषय आहे. त्याचबरोबर अजित पवारांशी वैर निर्माण झालेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर वाद मिटवून घेणाऱ्या विजय पुरंदरे यांचा प्रभाव असलेल्या पुरंदरमध्ये सुनेत्रा पवारांना किती मदत होते, हेही बघावं लागणार आहे.

हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला 'एवढ्या' जागा मिळतील', CM शिंदेंनी आकडाच सांगून टाकला! 

बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वतः अजित पवार आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालेले आहे. त्यामुळे त्यामुळे बारामतीतील लोकांनी कुणाच्या पारड्यात मते टाकली, याबद्दल वेगवेगळे कयास लावले जात असले, तरी घटलेल्या टक्क्याबद्दल सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. याचा फटका कुणाला बसणार? अशी चर्चा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT