हॉटेलच्या रूममध्ये 3 दिवस होते सख्खे भाऊ-बहीण, दरवाजा उघडताच समोर दिसलं भलतंच काही!

मुंबई तक

एका हॉटेलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघे भाऊ-बहीण त्या हॉटेलच्या एका रूममध्ये तीन दिवसांपासून राहत होते. मात्र, चेकआउटच्या दिवशी ते वेळेवर रिसेप्शनवर न आल्याने पोलिसांना बोलवून दार उघडण्यात आलं आणि त्यावेळी खोलीत धक्कादायक दृश्य दिसलं.

ADVERTISEMENT

हॉटेलच्या एकाच रूममध्ये सख्खे भाऊ-बहिण
हॉटेलच्या एकाच रूममध्ये सख्खे भाऊ-बहिण
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलच्या एकाच रूममध्ये सख्खे भाऊ-बहिण

point

चेकआउटच्या वेळी न आल्याने उघडलं दार

point

शेवटी दिसलं धक्कादायक दृश्य

Crime News: उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील सिगरा पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कँट रेल्वे स्टेशनसमोरील परेड कोठी परिसरात असलेल्या सिटी इन हॉटेलमध्ये एका भाऊ आणि बहिणीचे मृतदेह बंद खोलीत आढळले. हे दोघे गेल्या तीन दिवसांपासून हॉटेलमध्ये राहत होते आणि वाराणसीत फिरण्यासाठी आल्याचं वृत्त आहे. खोलीतून अंदाजे 6 लाख 61 हजार रुपये, एक लॅपटॉप आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. 

बराच वेळ खोलीतून बाहेर आले नाहीत... 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील रहिवासी असलेले दोघे भाऊ आणि बहीण गेल्या तीन दिवसांपासून हॉटेल सिटी इनच्या रूम नंबर 2005 मध्ये राहत होते. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी त्यांना हॉटेलमधून चेकआउट करायचं होतं. त्या दिवशी, दोघे ठरलेल्या वेळेवर रिसेप्शनवर न पोहोचल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी इंटरकॉम आणि मोबाईल फोनद्वारे त्यांच्याशी बऱ्याचदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने हॉटेल मॅनेजरने ताबडतोब सिगरा पोलीस स्टेशनला याबाबत कळवलं. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, मास्टर की वापरून रूम अनलॉक करण्यात आली. 

भाऊ आणि बहीण बेशुद्ध अवस्थेत... 

खोलीचं दार उघडताच, आतील दृश्य पाहून पोलीस आणि हॉटेल कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. भाऊ आणि बहीण जमिनीवरील गादीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता, ज्यामुळे त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोलीत हाणामारीचं कोणतंही चिन्ह आढळलं नाही. टेबलावर काही औषधे विखुरलेल्या अवस्थेत होती. ती औषधे पोलिसांनी पुरावा म्हणून जप्त केली आणि त्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला. 

हे ही वाचा: कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा! बीडमधील परीक्षा केंद्रावर पालकांकडून कॉपीचा पुरवठा... ड्रोनमध्ये कैद, आता FIR चे आदेश

पोलिसांनी खोलीची झडती घेतली आणि पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, लॅपटॉप आणि 6 लाख 61 हजार रुपये जप्त केले. कागदपत्रांवरून मृतांची ओळख पटली असून गणेश गौड गुनलापल्ली (46) आणि धनलक्ष्मी गुनलापल्ली (38) अशी त्यांची नावे समोर आली आहे. दोघेही हैदराबादच्या सिकंदराबादमधील सीताफळ मंडी परिसरातील रहिवासी होते. त्यांच्या ओळखपत्रांवरील पत्त्याची तपासणी केली असता ते 2018 मध्येच तो सोडून गेले होते, असे दिसून आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp