बायकोच्या हत्येचा गुन्हा दाखल केला, पण दोन वर्षांनी आधार ओटीपी आला अन्...

मुंबई तक

Crime News : उत्तरप्रदेशातील एक महिला आपल्या मुलासोबत दोन वर्षांपूर्वी घरातून गायब झाली होती. तिची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र एके दिवशी नवऱ्याच्या फोनवर एक ओटीपी आला आणि घरातून गायब झालेल्या महिलेचा पत्ता सापडला. ही माहिती नवऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. नवऱ्याने आपल्या बायकोला स्वीकारण्यास नकार दिला, मात्र मुलाला माझ्याकडे सुपूर्द करण्यात यावं अशी मागणी केली. पण मुलानेच आपल्या वडिलांना न ओळखल्याने उपस्थितांना धक्काच बसला. नेमकी घटना काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोच्या हत्येचा गुन्हा दाखल केला

point

पण दोन वर्षांनी आधार ओटीपी आला अन्...

Crime News : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एका महिलेच्या हत्येचा गुन्हा खुद्द तिच्या पतीनेच नोंदवला होता, मात्र दोन वर्षांनंतर एका 'ओटीपी'मुळे ती महिला जिवंत असल्याचे समोर आले आहे. कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलखाव गावातील प्रियंका नावाच्या महिलेचा विवाह 2017 मध्ये संदीपशी झाला होता. संसाराला सात वर्षे पूर्ण झाली आणि त्यांना एक मुलगाही झाला, मात्र सततच्या घरगुती वादाला कंटाळून 1 जुलै 2024 रोजी प्रियंका दागिने घेऊन घरातून निघून गेली. तिने अयोध्येत सरयू नदीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला, पण राजस्थानहून दर्शनासाठी आलेल्या मंगलचंद्र नामक व्यक्तीने तिचे प्राण वाचवले. त्यानंतर प्रियंकाने मृत्यूचा विचार सोडून मंगलचंद्रसोबत राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथे ती लिव्ह-इनमध्ये राहू लागली.

हे ही वाचा : नागपूर: 15 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार! प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी... अल्पवयीन आरोपी अटकेत

हत्येचा गुन्हा दाखल

दुसरीकडे, पत्नी आणि मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने खचलेल्या संदीपने त्यांची खूप शोधमोहीम राबवली. त्यांना शोधण्यात अपयश आल्यावर, सासरच्या मंडळींनीच दागिन्यांच्या लोभापोटी मायलेकांची हत्या करून मृतदेह नदीत फेकला असावा, असा संशय त्याला आला. पोलिसांनी तक्रार न घेतल्याने संदीपने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाच्या आदेशानुसार 4 नोव्हेंबर 2024 रोजी प्रियंकाचे आई-वडील, चुलत बहीण आणि इतर एका व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन वर्षांपासून पोलीस कागदोपत्री 'मृत' असलेल्या महिलेचा सुगावा लावत होते, पण काहीच हाती लागत नव्हते.

आधार कार्ड अपडेट करायला गेली अन्..

या प्रकरणाला कलाटणी मिळाली जेव्हा प्रियंका राजस्थानमध्ये आपली ओळख बदलण्यासाठी आधार केंद्रावर गेली. तिने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जुना नंबर टाकताच, त्याशी लिंक असलेल्या आणि पती संदीपच्या ताब्यात असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी गेला. अचानक आलेल्या या ओटीपीमुळे संदीप सावध झाला आणि त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थान गाठून प्रियंका आणि तिच्या मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून ज्यांच्या खुनाचा आरोप सासरच्यांवर होता, ती महिला अचानक जिवंत समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp