Maharashtra Politics : राज ठाकरेंची साथ सोडणारा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत!
kirtikumar shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेल्या कीर्तिकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कीर्तिकुमार शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दिला होता राजीनामा

राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने झाले होते नाराज
Kirtikumar Shinde : राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर नाराज झालेल्या कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मनसेचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. (Kirtikumar Shinde Joined Uddhav Thackeray led Shiv Sena)
कीर्तिकुमार शिंदे यांनी सोशल मीडियावर पक्षप्रवेशाचे फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीबद्दल त्यांच्या भावना मांडल्या आहेत.
शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केल्यानंतर शिंदे यांची पोस्ट
"मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे."
"शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी 'मातोश्री' येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजी यांनी मला शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला."