Sanjay Raut : 'शिंदेंची अखेरची फडफड'; राऊत फडणवीसांना म्हणाले, 'कच्चे मडके'
Sanjay Raut criticize Eknath Shinde Devendra Fadnavis : काळू बाळूचा तमाशा फार गाजला होता, काळू बाळूचा तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ताकद होती. काळू बाळूंनी महाराष्ट्रात जागृती आणि समाजिक सुधारणा केली होती. पण बावनकुळेंसारख्या व्यक्तीने त्यांचा अपमान केला. त्यामुळे बावनकुळेंचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काहीच संबंधच राहिला नाही आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut criticize Eknath Shinde Devendra Fadnavis : 'अजित पवारांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्याने ते मोकळे झाले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) धावपळ करतायत, पण त्यांची ही अखेरची फडफड आहे. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राजकारणातलं कच्चं मडकं असल्याची' बोचरी टीका शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. (sanjay raut criticize eknath shinde devendDevendra Fadnavis : "आमची चूक झाली", उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधानra fadnavis chandrashekhar bawankule udhhav thackeray samana interview lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
संजय राऊत नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरेंची मुलाखत ही काळू बाळूचा तमाशा असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या टीकेवर संजय राऊत म्हणाले, काळू बाळूचा तमाशा फार गाजला होता, काळू बाळूचा तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ताकद होती. काळू बाळूंनी महाराष्ट्रात जागृती आणि समाजिक सुधारणा केली होती. पण बावनकुळेंसारख्या व्यक्तीने त्यांचा अपमान केला. त्यामुळे बावनकुळेंचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काहीच संबंधच राहिला नाही आहे. तसेच हा तमाशा जरी असला तरी डफावरती जी थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली आहे, असा टोला राऊतांनी बालनकुळेंना लगावला.
हे ही वाचा : अजित पवारांना धक्के, फडणवीसांनी विधानसभेसाठी टाकला डाव?
देवेंद्र फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्याने घेऊ नका. ते राजकारणातलं अत्यंत कच्च मडकं आहे. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, अगदी तसचं. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूका लढलो आणि हरलो. हे फडणवीसांना माहित नसेल कारण ते फार राजकारणात नव्हते, अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली.
हे वाचलं का?
नाशिक घोटाळ्याबाबत 14 मेला सविस्तर बोलणार आहे. नाशिकमध्ये 800 कोटीचा घोटाळा झाला आहे.मुख्यमंत्री, नगरविकास खाते आणि स्थानिक नेते या घोटाळ्यात सहभागी आहेत. ही लहान गोष्ट नाही. शेतकरी नसलेल्या बिल्डरांना भुसंपादनाच्या नावाखाली पैसै मिळाले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा : '4 जूनला याच हातांनी मुंडेसाहेबांचे अत्यसंस्कार केले, आता...',
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT