Govt Job: जर तुम्ही अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलं असेल आणि सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) कडून बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने ‘फील्ड इंजिनिअर’ आणि ‘फील्ड सुपरवायझर’च्या 1543 पदांसाठी भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. देशभरातील कोणताही तरुण यात सहजपणे सहभागी होऊ शकतो, यामुळेच या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल ठेवण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर पदावर नियुक्तीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई (B.E), बीटेक (B.Tech) किंवा बीएससी (B.Sc) इंजिनीयरिंग पदवी असणे आवश्यक आहे. ही डिग्री उमेदवारांनी किमान 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. याशिवाय, काही विशेष पात्रता निकष देखील आवश्यक आहेत जे उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. ही सर्व माहिती अधिकृत नोटिफिकेशन आणि वेबसाइटवर दिली आहे.
किती मिळेल पगार?
फील्ड इंजिनिअर पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 30,000 ते 1,20,000 रुपये पगार मिळेल. तर फील्ड सुपरवायझर पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना 23,000 ते 1,05,000 रुपये पगार मिळेल. म्हणजेच, दोन्ही पदांवर चांगल्या पॅकेजसह करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई ते रत्नागिरी पर्यंतचा प्रवास केवळ 5 तास... ‘ही’ सेवा पुढच्या महिन्यातच होणार सुरू!
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचं कमाल वय 29 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल. अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना 5 वर्षे सूट दिली जाईल आणि तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सूट दिली जाईल. याव्यतिरिक्त, दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे सूट दिली जाईल.
परीक्षेचं स्वरूप
‘पॉवर ग्रिड’ची ही भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित असेल. उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी उमेदवारांना 1 गुण मिळेल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल, म्हणजेच चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. हा उमेदवारांसाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे.
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: मुंबईतील बाप्पाच्या दर्शनासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! मध्य रेल्वेवर 'इतक्या' स्पेशल ट्रेन धावणार
परीक्षेत ‘या’ विषयांमधून प्रश्न…
- टेक्निकल
- इंग्रजी भाषा
- बुद्धिमत्ता
- परिमाणात्मक अभिरुची (क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिट्यूड)
- सामान्य जागरूकता
कसा कराल अर्ज?
1. उमेदवाराला सर्वप्रथम ‘पॉवर ग्रिड’च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथील भरती सेक्शनमध्ये जा आणि 'फील्ड इंजिनिअर/पर्यवेक्षक भरती 2025’ या लिंकवर क्लिक करा.
2. त्यानंतर आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरा.
3. आवश्यक डॉक्यूमेंट्स स्कॅन करून अपलोड करा.
4. अर्ज शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
5. शेवटी, उमेदवारांनी फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.
ADVERTISEMENT
