Crime News: पती आणि पत्नीचं नातं हे सात जन्मांचं असल्याचं सांगितलं जातं. मात्र, बऱ्याचदा या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असल्यचं पाहायला मिळतं. उत्तर प्रदेशातील अमेठी येथून असाच एक प्रकार समोर आला आहे. एक पाच मुलांची आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. दरम्यान, नवऱ्याला याची काहीच कल्पना नव्हती. तो 7 दिवस आपल्या पत्नीचा शोध घेत राहिला. आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं कळताच पतीच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
ADVERTISEMENT
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना संग्रामपूर पोलिस स्टेशन परिसरातील करुंडी गावातील आहे. राम अवतार यादव आपल्या कुटुंबासह तिथे राहत असल्याची माहिती आहे. त्यांना पाच मुले असल्याचं सांगितलं जात आहे. एके दिवशी त्यांची पत्नी किरण यादव अचानक घरातून गायब झाली. त्यानंतर पती काळजीत पडला आणि त्याने आपल्या पत्नीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलांनीही त्यांच्या आईला इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली. पण त्यांना पत्नीचा काहीच पत्ता लागला नाही. या सगळ्यात 7 दिवस उलटून गेले.
हे ही वाचा: गणपती मंडपात मृत्यूचा तांडव... चाकूने वार करून तरुणाची हत्या! नेमकं काय घडलं?
पत्नी दुसऱ्याच तरुणासोबत गेली पळून...
एके दिवशी आपली पत्नी सहजीपूर गावातील एका तरुणासोबत पळून गेल्याची पतीला माहिती मिळाली. हे ऐकून पतीला मोठा धक्का बसला. त्यानंतर तो पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने एफआयआर दाखल केला. तक्रार करताना राम अवतार म्हणाला, “साहेब, माझी पत्नी दुसऱ्या कोणासोबत पळून गेली आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ती घरातून निघाली. आम्ही तिचा 7 दिवस शोध घेतला. त्यानंतर आम्हाला तिच्या विषयी हे सत्य कळालं. आम्हा दोघांना पाच मुले आहेत. एका मुलीचं लग्न झालं आहे तर दुसऱ्या मुलीचं पुढच्या वर्षी लग्न आहे. माझ्या पत्नीच्या कृत्यामुळे समाजात आमची बदनामी होत आहे.”
पतीने नोंदवली तक्रार
पीडित पतीने पोलिसांना सांगितलं की, ”मी एक गरीब माणूस आहे. माझी दोन मुलं बाहेर काम करतात. तिसरा मुलगा घरीच राहून मजूर म्हणून काम करतो. माझ्या पत्नीच्या या कृत्यामुळे आम्ही कोणालाही तोंड दाखवू शकत नाही. साहेब, कृपया माझ्या पत्नीला शोधा.”
हे ही वाचा: गणेश चतुर्थी 2025: जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान! प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांची उपस्थिती...
पोलिसांनी दिली माहिती
संग्रामपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम अवतार नावाच्या व्यक्तीने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. त्याने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार केली असून पोलीस दोघांचाही शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना ताब्यात घेतलं जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
