संतापजनक! रंग उडवल्याचा राग, आजीने 4 वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतले; नागपुरातील घटना

Nagpur Crime : ओमची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत भरून घेऊन जात होत्या. यावेळी खेळकरपणे ओमने आपल्या हातातील पिचकारीने आजीच्या अंगावर रंग उडवला. नातवाचा हा खोडकरपणा सहन न झाल्याने आजी सिंधू ठाकरे यांचा संयम सुटला. संतापलेल्या आजीने कसलाही विचार न करता, हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट चार वर्षांच्या ओमच्या अंगावर रिकामी केली.

 picture Nagpur Crime News

picture Nagpur Crime News

योगेश पांडे

05 Mar 2026 (अपडेटेड: 05 Mar 2026, 08:55 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतापजनक! रंग उडवल्याचा राग

point

आजीने 4 वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतले; नागपुरातील घटना

Nagpur Crime, नागपूर (कोराडी) : रंगांचा सण असलेल्या धुळवडीच्या उत्साहामध्ये नागपूरच्या कोराडी परिसरात एक अत्यंत अमानुष आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 4 वर्षांच्या नातवाने अंगावर पिचकारीने रंग उडवला, या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात सख्ख्या आजीने नातवाच्या अंगावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी परिसरात राहणारा ओम हरीश वांगे हा 4 वर्षांचा चिमुरडा आपल्या घराबाहेर पिचकारीने रंग खेळत होता. सणाचे वातावरण असल्याने बालक आनंदाने घराबाहेर बागडत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. ओमची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर गरम केलेले पाणी बादलीत भरून घेऊन जात होत्या. यावेळी खेळकरपणे ओमने आपल्या हातातील पिचकारीने आजीच्या अंगावर रंग उडवला. नातवाचा हा खोडकरपणा सहन न झाल्याने आजी सिंधू ठाकरे यांचा संयम सुटला. संतापलेल्या आजीने कसलाही विचार न करता, हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट चार वर्षांच्या ओमच्या अंगावर रिकामी केली.

हेही वाचा : आरोपीने पीडितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड, नवऱ्यासह मुलांना सोडून महिला गेली पळून... नंतर झाला पश्चात्ताप

बालक 45 टक्के भाजले

उकळते पाणी अंगावर पडताच ओम वेदनेने विव्हळू लागला आणि त्याने मोठा आरडाओरडा सुरू केला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य आणि शेजारी मदतीला धावले. तातडीने त्याच्या अंगावर थंड पाणी टाकून दाह कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाण्याचे तापमान खूप जास्त असल्याने ओम गंभीररित्या भाजला गेला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गरम पाण्यामुळे ओमच्या कमरेखालचा भाग पूर्णपणे होरपळला असून तो सुमारे 45 टक्के भाजला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओमचे वडील वेकोलीमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

ही संपूर्ण थरारक घटना घराबाहेर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये आजीने क्रूरपणे बादलीतील गरम पाणी मुलावर ओतल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून स्वतःच्या रक्ताच्या नात्याबद्दल इतकी क्रूरता कशी असू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलिस तपास सुरू

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून, या अमानुष कृत्याबद्दल आरोपी आजीवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस
 

    follow whatsapp