Govt Job: BSNL मध्ये मोठ्या पदांची भरती! फ्रेशर्स उमेदवारांना देखील मिळेल तगडा पगार अन्...

मुंबई तक

• 02:36 PM • 04 Mar 2026

'भारत संचार निगम लिमिटेड'च्या सीनिअर एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा कालावधी आता वाढवण्यात आला आहे. बीएसएनएल (BSNL)कडून ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.

BSNL मध्ये मोठ्या पदांची भरती!

BSNL मध्ये मोठ्या पदांची भरती!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

BSNL मध्ये मोठ्या पदांची बंपर भरती!

point

फ्रेशर्स उमेदवारांना देखील मिळेल तगडा पगार अन्...

Govt Job: 'भारत संचार निगम लिमिटेड'च्या सीनिअर एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा कालावधी आता वाढवण्यात आला आहे. बीएसएनएल (BSNL)कडून ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार www.bsnl.co.in या बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर आता 7 मार्च ऐवजी 31 मार्च २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात. फ्रेशर्स उमेदवारांसाठी BSNL मध्ये नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

सीनिअर एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी टेलीकॉम ऑपरेशन्स पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कंप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रिकल/ इंट्रूमेन्टेशन क्षेत्रात किमान 60 टक्के गुणांसह फुल टाइम बॅचलर ऑफ इंजीनिअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) डिग्री असणं आवश्यक आहे. 

तसेच, फायनान्समध्ये सीनिअर एक्झिक्यूटिव्ह ट्रेनी पदासाठी उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंटेंट (CA), कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटेन्सी (CMA) ची डिग्री असणं अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त इतर कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही. म्हणून, जे उमेदवार फ्रेशर्स आहेत आणि पदवीशिवाय इतर कोणताही अनुभव नाही ते देखील अर्ज करू शकतात. 

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना  IDA पे स्केल (E-3) अंतर्गत 24,900 रुपये ते 50,000 रुपये पगार मिळेल. 

हे ही वाचा: राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र, दोन अनपेक्षित चेहरे मैदानात, आदिवासी, धनगर, दलित, मराठा चेहऱ्यांना संधी

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार bsnl.co.in या BSNL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 
2. त्यानंतर, About Us च्या कॉलमध्ये जाऊन Career सेक्शन सिलेक्ट करा. 
3. यामध्ये बीएसएनलच्या संबंधित भरतीच्या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. 
4. रजिस्ट्रेशन करतेवेळी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अशी माहिती योग्यरित्या भरा. 
5. आता लॉगिन क्रेडेंशिअलच्या साहाय्याने पोर्टलवर लॉगिन करा. 
6. त्यानंतर, योग्यरित्या सर्व माहिती भरा आणि अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा. शेवटी अर्जाची अर्जाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

अर्ज करण्यासाठी  जनरल (Open), ओबीसी (OBC), ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 2500 रुपये शुल्क तसेच, एससी (SC)/ एसटी (ST)/ पीएच (PH) उमेदवारांना 1250 रुपये शुल्क भरावं लागेल.