मुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार, ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू; व्हिडिओ

मुंबई तक

05 Mar 2026 (अपडेटेड: 05 Mar 2026, 09:17 AM)

Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. पालघरमधील सोमटा परिसरात एका धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने ट्रकचालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या भीषण दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, याचा व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Palghar Accident News

Palghar Accident News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई-अहमदाबाद हायवेवर बर्निंग ट्रकचा थरार

point

ट्रक ड्रायव्हरचा केबिनमध्येच होरपळून मृत्यू, व्हिडीओ

Palghar Accident News, मोहम्मद हुसैन खान : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण दुर्घटना घडली. पालघरमधील सोमटा परिसरात एका धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने ट्रकचालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. या भीषण दुर्घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, याचा व्हिडिओ पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस

ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

हा ट्रक मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जात होता. महामार्गावरून जात असताना समोर असलेल्या एका वाहनाला ट्रकची जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक लागताच ट्रकला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. 

 

 

हे ही वाचा : ब्राह्मण मुलीसोबत तुमच्यातलाच असल्याचं सांगून संबंध ठेवले, गरोदर झाल्याने लग्नाचा तगादा लावताच धर्मांतरासाठी दबाव

चालकाचा दुर्दैवी अंत

ट्रकला लागलेली आग इतकी वेगाने पसरली की, चालक केबिनमध्येच अडकून पडला. आग इतकी भीषण होती की चालकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यावेळी ट्रकचा क्लिनर बाहेर पडला, मात्र तोदेखील गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.