Maharashtra Weather : राज्यातील 'या' चार जिल्ह्यांना उन्हाचा चटका, IMD चा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 04 Mar 2026

Maharashtra Weather : राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. अशातच कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची दाट शक्यता असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला. राज्यातील जिल्ह्यांना हवामान विभागाने 4 मार्च 2026 रोजी उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ

point

'या' चार जिल्ह्याला उन्हाचा चटका लागणार

Maharashtra Weather : राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. अशातच कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची दाट शक्यता असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला. राज्यातील जिल्ह्यांना हवामान विभागाने 4 मार्च 2026 रोजी उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज.

हे वाचलं का?

हे ही वाचा : गोंदिया : रंग खेळून अंघोळीसाठी तलावावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

राज्यातील 'या' जिल्ह्यांना उन्हाचा फटका बसणार 

कोकणात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांत हवामान उष्ण राहणार आहे. याच जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे.

समुद्रकिनारी आर्द्रता राहण्याची शक्यता

कोकणातील या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान हे 23 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. तसेच समुद्रकिनारी भागात आर्द्रता राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि सायंकाळी उकाडा जाणवेल.

उष्णतेमुळे डिहायड्रेशन, थकवा किंवा उष्मघाताचा अधिक धोका

उष्णतेमुळे डिहायड्रेशन, थकवा किंवा उष्मघाताचा अधिक धोका वाढण्याची अधिक शक्यता आहे. त्यसाठी भरपूर पाणी प्यावे, तसेच अधिकचा सूर्यप्रकाशात राहू नये, दुपारी अधिककरून सावलीतच थांबावे, असा हवामान विभागाने सांगितले आहे.

हे ही वाचा : नवरा हुंड्यासाठी बायकोला मारायचा, नंतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून... लाज आणणारा प्रकार

एकंदरीत 4 मार्च रोजी राज्यातील कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा अधिकचा तडाखा जाणवेल. घराबाहेर जाण्यासाठी सकाळी लवकर जावे किंवा सायंकाळी जावे, ज्यामुळे उन्हाच्या अधिक संपर्कात येणार नाही.