BPCL Recruitment : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) द्वारे विविध तंत्रज्ञान आणि ऑपरेटर पदांच्या एकूण 154 जागांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) च्या 60 जागा, प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) च्या 64 जागा, टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल) च्या 13 जागा आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) च्या 17 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सार्वजनिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेतील डिप्लोमासह किमान 1 वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांना किमान 60% गुण, तर एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी 50% गुण आवश्यक आहेत. 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे; तसेच नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Ajinkya Rahane Networth : मुंबईत आलिशान घर, लक्झरी कार्स... मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची संपत्ती आहे तरी किती?
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई आणि कोची येथील प्रकल्पांमध्ये नियुक्ती दिली जाईल. सर्व अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना NG-2 ग्रेडच्या प्रवेश स्तरावर 26,500 रुपयांच्या किमान मूळ वेतनावर (पे-स्केल 26,500 ते 34,000) रुजू केले जाईल. याशिवाय मूळ वेतनासोबत महागाई भत्ता (DA) आणि कंपनीच्या नियमांनुसार इतर सर्व भत्ते व सुविधा लागू राहतील. इतर सरकारी किंवा निमसरकारी संस्थांमधून योग्य मार्गाने रुजू होणाऱ्या उमेदवारांचे मागील मूळ वेतन संरक्षित केले जाईल.
हे ही वाचा : ‘तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही…’, ‘ती’ घोषणा करत अजिंक्य रहाणेला रडूच कोसळलं!
अर्जाची अंतिम मुदत
या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. अर्जासाठी 'जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस' प्रवर्गातील उमेदवारांना 590 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल, तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना शुल्कात पूर्ण सूट देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2026 असून, या भरतीची परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये घेतली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळेत अधिकृत वेबसाईटवरून अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












