Govt Jobs : नागपूर विद्यापीठात सहायक प्राध्यापकांची भरती सुरु, लगेच करा अर्ज

मुंबई तक

29 Jul 2026 (अपडेटेड: 29 Jul 2026, 04:06 PM)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट आहे.

Assistant Professor Recruitment

Assistant Professor Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांची भरती सुरु

point

लगेच करा अर्ज

Assistant Professor Recruitment : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने विविध शैक्षणिक विभागांसाठी सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांच्या एकूण 139 जागांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या पदभरतीमुळे पात्र उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष काय?

या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. अर्जदार उमेदवाराकडे संबंधित विषयात किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर (Post Graduate) पदवी तसेच B.E./B.Tech., M.E./M.Tech., किंवा B.Pharm. ची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराने पदानुसार NET/SET परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा Ph.D. पदवी धारण केलेली असावी. वयोमर्यादेच्या बाबतीत 10 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचे वय 59 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडता, गृहमंत्र्यांमध्ये इथे बसण्याची हिंमत नाही', राहुल गांधींचं भाषण अन् लोकसभेत राडा

असा करा अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची फी खुल्या प्रवर्गातील (Open Category) उमेदवारांसाठी 500 रुपये तर राखीव प्रवर्गातील (Reserved Category) उमेदवारांसाठी 300 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नागपूर येथेच सेवा बजावावी लागणार आहे.

हे ही वाचा : महिला शिक्षिकेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, नवऱ्याला संपवण्याची धमकी

अर्जाची अंतिम मुदत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी rtmnuoarec.samarth.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला अर्ज भरावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट ही देण्यात आली आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने, उमेदवारांनी वेळेत अर्ज पूर्ण करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.