Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ, IMD चा मोठा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 28 Jul 2026

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. कुठे यलो तर कुठे पावसाच्या ऑरेंज अलर्टची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात मान्सून कमी दाखल झालाय. अशातच जाणून घ्या 28 जुलै रोजी राज्यातील हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

point

जाणून घ्या 28 जुलै रोजी राज्यातील हवामान अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. कुठे यलो तर कुठे पावसाच्या ऑरेंज अलर्टची शक्यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात मान्सून कमी दाखल झालाय. अशातच जाणून घ्या 28 जुलै रोजी राज्यातील हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वरा दारू पिऊन फुल्ल टाईट, गर्भवती बायकोची विळ्याने निर्घृण हत्या

कोकण 

कोकण विभागातील पालघरमध्ये हलका ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह विजांचा कडकडाट जाणवणार आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली. अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टची शक्यता आहे. तर सांगलीत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पावसासह विजांचा अंदाज आहे.  

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अकोलामध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. बीड, लातूर आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : र्सरीच्या विद्यार्थ्यानं पँटमध्ये केली लघवी, शिक्षिकेनं चाकू तापवला अन् दिले गुप्तांगाला भयंकर चटके

विदर्भ 

गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय. अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा येथे पावसाचा ऑरेंज अलर्टची शक्यता आहे.