मुंबईची खबर : 25 ऑक्टोबरपर्यंत 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...; मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश

मुंबई तक

• 03:27 PM • 23 Oct 2026

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घ्या.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबई पोलिसांचे जमावबंदीचे आदेश

point

'या' गोष्टींवर पूर्ण बंदी

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या तरतुदींनुसार हे आदेश जारी केले असून, नागरिकांनी याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

काय आहेत आदेश?

मुंबईत लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र जमण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारच्या मिरवणुका, आंदोलने, सार्वजनिक सभा, लाऊडस्पीकर आणि वाद्यवृंदांचा वापर करण्यावर तसेच फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना याचे पालन करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : 'जरांगे पाटलांच्या विरोधात काय चाललंय?' राज ठाकरे संतापले, सत्ताधाऱ्यांना दिला गंभीर इशारा

'या' गोष्टींना सूट

मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या आणि व्यावसायिक जीवनाचा सुरळीत कारभार सुरू राहावा म्हणून अनेक गोष्टींना यातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये विवाह व त्यासंबंधित विधी, अंत्ययात्रा, कंपन्यांच्या कायदेशीर बैठका, सामाजिक मेळावे, तसेच चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

हे ही वाचा : CJP चे आंदोलन आता थंडावणार? सौरव दास आणि आशुतोष रांकाने काय दिली हमी?

परवानगी घेतलेल्या मोर्चांनाही सूट

याशिवाय व्यावसायिक दुकाने, कारखाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि पोलिसांची पूर्वपरवानगी घेतलेले शांततापूर्ण मोर्चे यांनाही या निर्बंधांपासून पूर्ण सूट देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना 25 ऑक्टोबरपर्यंत या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत मुंबईकरांना प्रशासनाच्या या निर्णयाचं पालन करावं लागणार आहे.