Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. हवामानात कुठे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे, अशातच जाणून घेऊयात 25 सप्टेंबर 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सुरक्षा रक्षकाने मुक्या जनावराला शालीत गुंडाळलं, केबिनमध्ये केला अत्याचार
कोकण
कोकणात पालघर, मुंबई, ठाणे, रायगड येथे उष्ण आणि दमट हवानाचा यलो अलर्ट वर्तविलेला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हवामान कोरडे राहील अशी शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर येथे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली, सोलापूर, सातारा घाटमाथा परिसरात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : गुण मिळवून देण्याचे आमिष अन् पीडितेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ येथे हवनामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
ADVERTISEMENT












