Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत विविध पदांसाठी भरती, 60 हजारांहून अधिक पगार

मुंबई तक

• 04:17 PM • 22 Oct 2026

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर आहे.

BHEL Recruitment

BHEL Recruitment

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये भरती

point

कसा कराल अर्ज?

BHEL Recruitment : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत 660 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत ‘आर्टिसन’ (Artisan) पदाच्या विविध ट्रेडसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये फिटर (278), वेल्डर (104), मशिनिस्ट (101), इलेक्ट्रिशियन (90), टर्नर (52), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (23) आणि फाउंड्रीमन (12) अशा एकूण 660 जागांचा समावेश आहे. आयटीआय (ITI) उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

हे वाचलं का?

पात्रतेचे निकष

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेडमध्ये 60% गुणांसह ITI किंवा NAC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (अनुसूचित जाती/जमातीसाठी 55% गुण). उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. नियमानुसार SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील BHEL च्या विविध युनिट्समध्ये केली जाईल.

हे ही वाचा : 'तो मराठवाड्यात गिळून घेईल तुम्हाला...', जरांगेंनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...

वेतन किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला एक वर्षाच्या कालावधीसाठी ‘अस्थायी आर्टिजन’ (Temporary Artisan) म्हणून नियुक्ती केली जाईल आणि या काळात त्यांना दरमहा 24,000 रुपये ठोक वेतन मिळेल. अस्थायी कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, त्यांना कंपनीच्या नियमांनुसार 'आर्टिसन ग्रेड-IV' म्हणून नियमित (Regularize) केले जाईल. नियमित झाल्यावर 29,500 ते 65,000 रुपये या वेतनश्रेणीनुसार नियमानुसार मिळणाऱ्या सर्व भत्त्यांसह आकर्षक पगार दिला जाईल.

हे ही वाचा : मुंबईची खबर : चर्चगेट ते विरार अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार? काय आहे प्लॅन? जाणून घ्या सविस्तर

'असा' करा अर्ज

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जासाठी सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 1,072 रुपये परीक्षा शुल्क आहे, तर SC, ST, PWD आणि माजी सैनिकांसाठी 472 रुपये शुल्क आकारले जाईल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2026 असून, यासाठीची परीक्षा 11डिसेंबर 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. इच्छुकांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळावर (bhel.com) जाऊन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.