Govt Jobs : रेल्वेमध्ये 4,098 पदांची भरती, कुठे अन् कसा कराल अर्ज?

मुंबई तक

• 04:14 PM • 28 Jul 2026

भारतीय रेल्वेने 4,098 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विविध पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे.

Indian Railway Recruitment

Indian Railway Recruitment

Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : रेल्वेमध्ये 4,098 पदांची भरती

point

कुठे अन् कसा कराल अर्ज?

Indian Railway Recruitment : भारतीय रेल्वेने इंजिनिअरिंग आणि सायन्स पार्श्वभूमी असलेल्या तरुणांसाठी भरतीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे भरती बोर्डाद्वारे ज्युनियर इंजिनिअर (JE), डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट या विविध पदांच्या एकूण 4,098 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. देशभरातील विविध रेल्वे बोर्डांतर्गत ही भरतीप्रक्रिया राबवली जाणार असून निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये इतके वेतन मिळणार आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्युनियर इंजिनिअर पदासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांसह संबंधित शाखांमधील इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे. डेपो मटेरियल सुपरिटेंडंट पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक पात्र असणार आहेत, तर केमिकल व मेटलर्जिकल असिस्टंट पदासाठी भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र (Physics/Chemistry) विषयात किमान 45% गुणांसह बी.एससी. (B.Sc) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

हे ही वाचा : Maharashtra Monsoon Update: धो-धो कोसळणार पाऊस, वादळी वाऱ्यांचाही जोर.. तुमच्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

अर्जाचे शुल्क

उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे. शासकीय नियमांनुसार अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) मधील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी खुला, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये परीक्षा शुल्क असून, एससी, एसटी, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, ईबीसी आणि महिला उमेदवारांसाठी हे शुल्क 250 रुपये ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा : लेकीचं मुलावर प्रेम, ओढणीनं गळा आवळून आईनं मुलीला संपवलं

अर्जाची अंतिम मुदत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2026 आहे. संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी अंतिम तारखेची वाट न पाहता मुदतीत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.