Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळताना दिसत आहे. अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा यलो तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची चिन्हे आहेत. अशातच जाणून घेऊयात 27 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सोलापूर हादरलं! 14 वर्षीय मुलीसह आईने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन
कोकण
कोकण विभागातील पालघरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा ऑरेंज अलर्टची शक्यता जारी केलेली आहे. कोकणात 27 जुलै रोजी पावसाची शक्यता असणार आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि यलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा परिसर आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याचा अंदाज. तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसासह वाऱ्याचा यलो अलर्ट आहे. धाराशिव, बीड आणि परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : भावासोबत जाण्यापासून वडिलांनी रोखलं, 10 वर्षीय लेकाकडून 45 वर्षीय वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला
विदर्भ
विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत हवामानाचा कोणताही अलर्ट वर्तवलेला नाही. भंडारा, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT












