12 वर्षीय मुलाचा बाराव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू, शेजारच्यांकडून कुटुंबाला माहिती

मुंबई तक

• 04:17 PM • 29 Jul 2026

Boy Fall from 12 th Flood : एका 12 वर्षीय मुलाचा एका सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून खेळता खेळता तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे, या घटनेची शेजारच्यांकडून कुटुंबीयांना माहिती मिळाली.

Boy Fall from 12 th Flood

Boy Fall from 12 th Flood

Google CTA

बातम्या हायलाइट

point

12 व्या मजल्यावरून तोल जाऊन मुलाचा अंत 

point

मुलगा पडल्याची शेजारच्यांकडून माहिती 

Boy Fall from 12 th Flood : दिल्लीच्या गुरुग्राम येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका 12 वर्षीय मुलाचा एका सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून खेळता खेळता तोल जाऊन मृत्यू झाला. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. अनमोल सोसायटी असे घटनास्थळाचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर तपास सुरू केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलगा मानसिक रुग्ण, विटेनं हल्ला करत आईची हत्या; बहिणीला देखील सोडलं नाही

12 व्या मजल्यावरून तोल जाऊन मुलाचा अंत 

संबंधित प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवण्यात आलाय. मृत मुलाची राहुल शर्मा (वय 12) अशी ओळख समोर आलेली आहे. तो मंगळवारी आपल्या फ्लॅटच्या बाल्कनित इतर मुलांसोबत खेळत होता. तेव्हा खेळताना मुलाचा तोल गेल्यानंतर ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेची कुटुंबीयांना माहिती नव्हती. 

हे ही वाचा : बायकोचे दोन दिरांसोबत संबंध, नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष मिसळल्याचा आरोप

मुलगा पडल्याची शेजारच्यांकडून माहिती 

दरम्यान, शेजारच्यांनी राहुलच्या कुटुंबीयांना मुलगा पडल्याची माहिती दिली होती. पालक आणि त्याचे नातेवाईक धावत घटनास्थळी गेले. त्याला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोवर उशिर होऊन गेला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. एक सीनियर पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह हा कुटुंबाकडे सोपवण्यात आला होता. संबंधित प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे.