Maharashtra Rain : 'अर्णब' चक्रीवादळाचा कसा परिणाम होणार? मुसळधार पाऊस कधी?

मुंबई तक

• 11:19 AM • 28 Oct 2026

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावरही जाणवण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Report

Maharashtra Weather Report

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अतितीव्र 'अर्णब' चक्रीवादळाचा धुमाकूळ

point

कुठे-कुठे मुसळधार?

Maharashtra Weather Report : बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'अर्णव' (Cyclone Arnab) हे अति तीव्र चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. समुद्राचे उष्ण तापमान, वातावरणातील आर्द्रता आणि वाऱ्यांच्या अनुकूल स्थितीमुळे या चक्रीवादळाची तीव्रता सतत वाढत गेली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून सुरू झालेला हा प्रवास डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन टप्प्यांतून जात अत्यंत शक्तिशाली स्वरूपात रूपांतरित झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हे वादळ विशाखापट्टनमच्या दक्षिण पूर्वेला सक्रिय असून किनारपट्टीकडे वेगाने मार्गस्थ होत आहे.

हे वाचलं का?

'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

या चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर प्रकर्षाने जाणवत असून विदर्भासह राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः बुधवारसाठी गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि नांदेडसह कोल्हापूर आणि लगतच्या पट्ट्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर आणि जालनासह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मान्सूनोत्तर पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.

हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक निकाल 2026 LIVE : प्रतापसिंह पाटील 13163 मतांनी आघाडीवर, रविराज साबळेंनी किती मतं?

या जिल्ह्यांना थंडरस्टॉर्मचा इशारा

गुरुवारी म्हणजेच 29 तारखेलाही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानाचा हाच प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे पावसाचा यलो अलर्ट कायम आहे, तर पुणे, सातारा आणि रायगडच्या घाट परिसरासह अमरावती आणि नागपूरमध्ये थंडरस्ट्रॉमचा इशारा देण्यात आला आहे. या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कमाल आणि रात्रीच्या तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट होणार असून, नागरिकांना ऑक्टोबर हीटच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : Graduate-Teacher Constituency Election Result: राज्यातील 5 मतदारसंघांत आज फैसला! कुठे कोणाची लढत? वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन

हवामान विभागाच्या या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी आगामी काही दिवस पेरणीची कामे टाळावीत आणि हवामानाच्या ताज्या जिल्हानिहाय अपडेट्सवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. किनारपट्टी व अंतर्गत भागांत निर्माण झालेल्या या हवामान प्रणालीमुळे नागरिकांनी सुरक्षिततेची खबरदारी बाळगणे अत्यावश्यक ठरले आहे.