Govt Job: भारतीय हवाई दलाकडून 'या' पदांसाठी मोठी भरती! 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी...

अग्निवीर वायू पदाच्या या भरतीसाठी ज्या उमेदवारांना 1 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता आला नाही, ते आता iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

भारतीय हवाई दलाकडून 'या' पदांसाठी मोठी भरती!

भारतीय हवाई दलाकडून 'या' पदांसाठी मोठी भरती!

मुंबई तक

• 01:59 PM • 05 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवाई दलाकडून 'या' पदांसाठी मोठी भरती!

point

12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी...

Govt Job: अग्निवीर वायू पदाच्या या भरतीसाठी ज्या उमेदवारांना 1 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता आला नाही, ते आता iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. 3 मार्च ते 10 मार्च 2026 या 7 दिवसांसाठी अॅप्लिकेशन विंडो पुन्हा खुली करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंटरमिजिएट/ 10+2/ समतुल्य परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण असणं आवश्यक आहे. यासोबतच, मॅकेनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ कंप्यूटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तीन वर्षांचा इंजीनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. भौतिकशास्त्र (फीजिक्स) आणि गणित या विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक म्हणजेच व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार देखील यासाठी पात्र आहेत. 

हे ही वाचा: इंग्रजीत PhD, कन्नड-तेलगुसह 5 भाषांवर प्रभुत्व, आंबेडकरवादी चळवळीतही काम; ज्योती वाघमारे कोण आहेत? राज्यसभेची उमेदवारी मिळणार?

वयोमर्यादा 

याशिवाय, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान असणं अनिवार्य आहे. या दोन्ही तारखा लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. 

हे ही वाचा: लग्नानंतर पतीसाठी नोकरी सोडली... पण सासरी मिळाली 'ती' वागणूक; शेवटी इंजिनीअर पत्नीने संपवलं आयुष्य

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम iafrecruitment.edcil.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. आता Online Registraton For Agniveer Vayu INTAKE 01/2027 च्या लिंकवर क्लिक करा. 
3. या वेबसाइटवर नवीन असल्यास Register Here वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. 
4. लॉगिन केल्यानंतर, वैयक्तिक तसेच शैक्षणिक अशी सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. 
5. माहिती भरून झाल्यानंतर, फोटो आणि सही असे आवश्यक डॉक्यूमेंट्स स्कॅन करून योग्य फॉर्मेटमध्ये अपलोड करा. 
6. शेवटी, प्रवर्गानुसार शुल्क भरून अर्जाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात. 

    follow whatsapp