Mumbai Water cut : एल निनोमुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई शहरात येत्या 15 मे पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा मंगळवारी (28 एप्रिल) केली. पावसाळ्यापूर्वीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या निर्णयाची माहिती दिली.
ADVERTISEMENT
या तारखेपर्यंतच पुरणार पाणीसाठा
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण 28.35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध माहितीनुसार, हा साठा साधारणपणे 6 जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. मात्र, यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता असून पावसाच्या आगमनाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने आगाऊ पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : कधीकाळी 32 मतांनी निवडणूक जिंकून आमदार झाले, भाजपने विधानपरिषदेची संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत?
पाणीपुरवठ्यासाठी काय आहे योजना?
पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महानगरपालिकेने भातसा धरणामधून 123 दशलक्ष घनमीटर आणि अप्पर वैतरणा जलाशयातून 90 दशलक्ष घनमीटर राखीव पाणीसाठा वापरण्याची योजना आखली आहे. या राखीव साठ्याच्या वापरासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आली असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : आधी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, राज्यभर चर्चा होताच पार्थ पवारांचं ट्वीट करत स्पष्टीकरण; म्हणाले...
तर 17 ऑगस्टपर्यंत टिकेल पाणीसाठा
जर राज्य सरकारने हा राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी दिली आणि प्रस्तावित 10 टक्के पाणीकपात यशस्वीपणे लागू झाली, तर मुंबईचा पाणीपुरवठा 17 ऑगस्टपर्यंत टिकवून धरता येईल, असा विश्वास अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला. पावसाने ओढ दिल्यास नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











