मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?

मुंबई तक

• 08:19 AM • 28 Apr 2026

अंधेरी पूर्व येथील ड्रेनेज लाईनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक मृतदेह दिसला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला.

Mumbai Crime

Mumbai Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांना ड्रेनेजमध्ये सापडला महिलेचा मृतदेह

point

पोलिसांनी 24 तासात कसा लावला छडा?

Mumbai Crime, दीपेश त्रिपाठी : अंधेरी पोलिसांनी ड्रेनेज लाईनमध्ये सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) कर्मचाऱ्यांना साफसफाई दरम्यान ड्रेनेज लाईनमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

हे वाचलं का?

ड्रेनेज लाईनमध्ये सापडला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास अंधेरी पूर्व येथील ड्रेनेज लाईनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक मृतदेह दिसला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटवणे कठीण जात होते.

हे ही वाचा : जालना : अंत्यविधीसाठी आलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, घटनेनं शहर हादरलं

'अशी' पटली ओळख

तपासादरम्यान पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांची माहिती तपासली. त्या आधारे या महिलेची ओळख एका 40 वर्षीय निवासी म्हणून पटली, जी गेल्या काही काळापासून बेपत्ता होती. पोलिस चौकशी आणि तांत्रिक तपासणीनंतर असे समोर आले की, महिलेची हत्या तिच्याच ओळखीच्या व्यक्तींनी केली होती. जोसेफ कोयेलो (वय 65) आणि मारिया कोयेलो (वय 63) अशी आरोपींची नावे असून, ते अंधेरी पूर्व येथील मरोल पाईपलाईन भागात राहतात.

हे ही वाचा : भयंकर... मीरारोडमध्ये धर्म विचारून चाकूने भोसकले, अवघ्या परिसरात प्रचंड भीती!

का झाली हत्या?

घरगुती वादातून आरोपींनी महिलेची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ड्रेनेज लाईनमध्ये फेकून दिला, असे तपासात उघड झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध हत्येसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अंधेरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.