लग्नानंतर पतीसाठी नोकरी सोडली... पण सासरी मिळाली 'ती' वागणूक; शेवटी इंजिनीअर पत्नीने संपवलं आयुष्य
सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेने हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध हुंडाबळी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नानंतर पतीसाठी नोकरी सोडली... पण सासरी मिळाली 'ती' वागणूक
शेवटी इंजीनिअर पत्नीने संपवलं आयुष्य
Crime News: बंगळुरूतील सोलादेवनहल्ली परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका पी. सुषमा नावाच्या महिलेने हुंड्यासाठी छळ आणि कौटुंबिक वादाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा पती पुनीत कुमार याला अटक केल्याची माहिती आहे.
सुषमाचे वडील हे पोलीस विभागात रिटायर्ड असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (ASI) असून त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात कारवाई करत सुषमाचा पती पुनीत कुमार याच्याविरुद्ध हुंडाबळी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत एका प्रायव्हेट कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे.
सासरी हुंड्यासाठी सतत छळ
सुषमा आणि पुनीतचं 5 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्यांना एक 4 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पीडिता लग्नाआधी सॉफ्टवेअर इंजीनिअर म्हणून काम करत होती. मात्र, लग्न झाल्यानंतर तिने आपल्या पतीसाठी नोकरी सोडल्याचं सांगितलं जात आहे. सुषमाचे वडील टी.डी. प्रभाकरमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून 10 लाख रुपये रोख आणि भरपूर सोन्याचे दागिने दिले होते. इतकेच नव्हे तर, सुषमाने स्वतःच्या पैशांतून एक कार देखील खरेदी केली होती. तरीही, पुनीत आणि त्याची आई कल्पना यांनी पीडितेकडे लग्नानंतर सुद्धा आणखी हुंड्याची मागणी करण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: 6 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेली तरुणी घरी परतली; पण मध्यरात्री झाडाखाली आढळले दोघांचे मृतदेह...
पोलीस तपासात समोर आलं की, मागील काही महिन्यांपासून पीडितेच्या सासरी किरकोळ कारणावरून वारंवार वाद सुरू होते. घटनेच्या आदल्या दिवशी (सोमवारी) सुषमा आणि तिच्या सासूमध्ये जेवण बनवण्यावरून मोठा वाद झाला. महिलेच्या आईवडिलांचा आरोप आहे की तिची सासू तिला स्वयंपाक करण्यापासून रोखत होत्या आणि वेगवेगळ्या कारणांवरून मानसिक त्रास देत होत्या.










