6 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेली तरुणी घरी परतली; पण मध्यरात्री झाडाखाली आढळले दोघांचे मृतदेह...
एका प्रेमी युगुलाच्या प्रेमसंबंधाचा भयंकर पद्धतीने शेवट झाला. दोघे 6 महिन्यांपूर्वी गावातून पळून गेले होते. मात्र, संबंधित तरुणी एक आठवड्यापूर्वीच तिच्या आधी घरी परतली होती. पण, मध्यरात्रीच्या सुमारास कडुलिंबाच्या झाडाखाली दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
6 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत पळून गेलेली तरुणी घरी परतली
पण मध्यरात्री झाडाखाली आढळले दोघांचे मृतदेह
Crime News: बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका प्रेमी युगुलाच्या प्रेमसंबंधाचा भयंकर पद्धतीने शेवट झाला. होळीच्या ऐन सणातच गावातील आनंदी वातावरण शोकात बदललं. वृत्तानुसार, मुरगाव पंचायतीतील प्राण बिघा गावातील वावरात कडुलिंबाच्या झाडाखाली दोन मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. 25 वर्षीय राजीव कुमार आणि तिची प्रेयसी अशी मृतांची ओळख समोर आली आहे.
6 महिन्यांपूर्वी दोघे पळून गेले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, राजीव आणि त्याच्या प्रेयसीचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. याच प्रेमसंबंधामुळे, ते दोघे 6 महिन्यांपूर्वी गावातून पळून गेले होते. मात्र, संबंधित तरुणी एक आठवड्यापूर्वीच तिच्या आधी घरी परतली होती आणि राजीव अजूनही फरार होता. त्यानंतर, मुलीच्या कुटुंबियांनी राजीवविरुद्ध अपहरण अपहरण आणि फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. पण, तरुणी घरी परतल्यानंतर अवघ्या सात दिवसांतच ते दोघे असे आत्मघातकी पाऊल उचलतील, याची कोणालाच कल्पना नव्हती.
झाडाखाली आढळला मृतदेह
कुटुंबियांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजेपर्यंत तरुणी घरीच होती, परंतु नंतर ती अचानक गायब झाली. राजीव मंगळवारी रात्री लपुनछपून गावात आला आणि त्याने त्याच्या प्रेयसीला निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास गावकरी शेतात गेले तेव्हा त्यांना एका कडुलिंबाच्या झाडाखाली राजीव आणि त्याच्या प्रेयसीचे मृतदेह आढळले.
हे ही वाचा: शेजारच्या तरुणाशी मैत्री पडली महागात... 17 वर्षीय तरुणीने घर सोडलं अन् 6 महिन्यांनंतर समोर आली धक्कादायक बाब!
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि FSL टीम घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तसेच, घटनास्थळावर एक तुटलेला मोबाईल फोन सापडला, जो कदाचित पुरावा नष्ट करण्यासाठी किंवा रागाच्या भरात तोडण्यासाठी वापरला गेला असावा. मृतदेहांजवळ विषारी रसायनांचे रिकामे कंटेनर आढळले, ज्यामुळे सुरुवातीला विषबाधा करून आत्महत्या केल्याचा संशय वर्तवला जात आहे.










