शेजारच्या तरुणाशी मैत्री पडली महागात... 17 वर्षीय तरुणीने घर सोडलं अन् 6 महिन्यांनंतर समोर आली धक्कादायक बाब!

मुंबई तक

एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी चांगली मैत्री झाली. मात्र, कालांतराने त्यांच्यातील मैत्री आणखी घट्ट झाली आणि याच काळात घडलेल्या एका घटनेमुळे तरुणी तिचं घर सोडून गेली. पण, 6 महिन्यांनंतर एक धक्कादायक बाब समोर आली.

ADVERTISEMENT

17 वर्षीय तरुणीने घर सोडलं अन्...
17 वर्षीय तरुणीने घर सोडलं अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शेजारच्या तरुणाशी मैत्री पडली महागात...

point

17 वर्षीय तरुणीने घर सोडलं अन्...

point

6 महिन्यांनंतर समोर आली धक्कादायक बाब!

Crime News: एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीची तिच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी चांगली मैत्री झाली. कालांतराने त्यांच्यातील ही मैत्री आणखी घट्ट होत गेली. पण, जेव्हा तरुणीच्या कुटुंबीयांना याबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी तिला याबाबत फटकारलं. याच रागातून संबंधित तरुणी 25 ऑगस्ट 2025 रोजी घर सोडून गेली आणि अचानक बेपत्ता झाली. सहा महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) मोठं यश मिळवलं आणि तिला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. 

मुलीला सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं अन्... 

संबंधित प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्याच दिवशी बुराडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने हे संवेदनशील प्रकरण मानून दिल्ली पोलिसांच्या नोडल एजन्सी AHTU ने तपास हाती घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांशी, नातेवाईकांशी आणि शेजाऱ्यांशी सखोल चौकशी केली. टेक्निकल सर्व्हिलान्स, मॅन्युअल माहिती आणि अनेक संभाव्य ठिकाणी छापेमारी करण्यात आली. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर घरातून अचानक बेपत्ता झालेली मुलगी दिल्लीच्या दरियागंज भागात असल्याची माहिती मिळाली. टीमने तात्काळ कारवाई करून तिला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. 

हे ही वाचा: पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई, मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप; हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

पोलिसांच्या तपासात आलं समोर 

पोलिस तपासात समोर आलं की, शेजारी राहणाऱ्या तरुणाशी झालेल्या मैत्रीमुळे कुटुंबीयांनी तिला फटकारलं होतं. याच गोष्टीने नाराज होऊन ती रागाच्या भरात तिचं घर सोडून गेली आणि कुणालाही काहीच सांगितलं नाही. प्राथमिक तपासात अपहरणासारखी कोणतीही बाब समोर आली नसली तरीही पुढील कायदेशीर चौकशी सुरू आहे. 

हे ही वाचा: धुळवडीच्या दिवशी विवाहित प्रियकराला भेटायला गेली अन् सोबत आलेल्या भावांनीच तरुणाचा केला गेम...

तरुणीला आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बुराडी पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे. आता पुढील कारवाई स्थानिक पोलिसांकडून होईल. यानंतर, पोलिसांना नागरिकांना आवाहन केलं की, अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलीस विशेष सावधगिरी बाळगतात आणि अशा प्रकरणांना प्राधान्याने हाताळलं जातं. त्यांनी हेही म्हटलं की, कुटुंबियांनी मुलांशी खुला संवाद साधून ठेवावा, जेणेकरून अशा परिस्थिती निर्माण होणार नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp