Govt Jobs : पदवीधरांसाठी युनियन बँक ऑफ इंडियात कामाची संधी, 'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

ज्या तरुणांना बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

UBI Apprenticeship

UBI Apprenticeship

मुंबई तक

• 04:35 PM • 29 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : पदवीधरांसाठी युनियन बँक ऑफ इंडियात कामाची संधी

point

'ही' आहे अर्जाची शेवटची तारीख

UBI Apprenticeship : युनियन बँक ऑफ इंडियाने मोठ्या प्रमाणात अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध शाखांमध्ये एकूण 1865 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या तरुणांना बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

'अशी' आहे वयोमर्यादा

वयोमर्यादेबाबत बोलायचे झाल्यास, 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. मात्र, शासकीय नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली आहे. यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC - नॉन क्रिमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे. पात्र उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : ठाकरे गटाचा विधानपरिषदेचा उमेदवार ठरला, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

विद्यावेतन किती?

या शिकाऊ उमेदवारीचा कालावधी एक वर्षाचा असून, त्या दरम्यान उमेदवारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणानुसार आकर्षक विद्यावेतन (Stipend) दिले जाईल. ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाखांसाठी दरमहा 15,000 रुपये तर शहरी भागातील शाखांसाठी 18,000 रुपये, तर मेट्रो शहरांमधील शाखांसाठी 20,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जाणार आहे. या अनुभवाचा फायदा उमेदवारांना भविष्यात बँकिंग क्षेत्रातील कायमस्वरूपी नोकरीसाठी निश्चितच होऊ शकतो.

हे ही वाचा : 'प्रदेश त्यांचा, शहर त्यांचं..कुणाला खाज असेल त्यांनी यावं..' धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना खुले आव्हान

अर्जाची शेवटची तारीख आणि शुल्क

इच्छुक उमेदवारांना 19 मे 2026 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. अर्जासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाला 944 रुपये, महिला उमेदवारांना 708 रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना 236 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. योग्य पात्रता धारण करणाऱ्या तरुणांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित अर्ज करणे फायद्याचे ठरेल.