अकोला : विवाहित असूनही कथित 'बादशाह'ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, भयंकर कांड

Akola Crime : अकोल्यात गेमिंग ॲपच्या माध्यमातून ओळख करून हरियाणातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघड झाला असून, 'लव जिहाद'चा आरोप करत हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

Akola Crime

Akola Crime

मुंबई तक

29 Apr 2026 (अपडेटेड: 29 Apr 2026, 03:43 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अकोला : विवाहित असूनही कथित 'बादशाह'ने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं

point

5 दिवस घरात डांबून नको ते...

अकोला जिल्ह्यात कथित 'लव जिहाद'चे एक खळबळजनक प्रकरण समोर आले असून यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका विवाहित मुस्लिम युवकाने गेमिंग ॲपच्या माध्यमातून आपली खोटी ओळख सांगून हरियाणातील एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपीने या तरुणीला अकोल्यात बोलावून घेतले आणि सलग पाच दिवस तिला आपल्या घरात ठेवले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणीची सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले आहे. खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाईसाठी आरोपीला हरियाणा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव केल्यानंतर स्वरुपानंद देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

 'बादशाह' नावाने बनावट अकाउंट; विवाहित तरुणाने केला तरुणीचा 'ब्रेनवॉश'

या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख जमीर जाहीरउद्दीन काजी (वय 25 अशी झाली असून तो आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मूल देखील आहे. आरोपी जमीर एका गेमिंग ॲपवर 'बादशाह' या नावाने बनावट अकाउंट चालवत होता आणि त्या माध्यमातून तो वेगवेगळ्या तरुणींशी संपर्क साधत असे. याच दरम्यान त्याची ओळख हरियाणातील एका तरुणीशी झाली आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अकोल्यात येण्यास प्रवृत्त केले. आरोपीने या तरुणीला गीता नगर परिसरातील आपल्या घरात पाच दिवस ठेवले होते. तरुणीने आपल्या घरी आई ओरडल्याचे सांगितल्यावर, त्याचा फायदा घेऊन आरोपीने तिचे 'ब्रेनवॉश' केले आणि तिला स्वतःकडे राहण्यास भाग पाडले, असा दावा केला जात आहे.

 भावाच्या शोधामुळे फुटले भांडं; हिंदू संघटना आक्रमक

दुसरीकडे, तरुणी बेपत्ता झाल्यामुळे हरियाणात तिच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तिचा शोध घेत असताना तिचा भाऊ अकोल्यात पोहोचला आणि त्याने खदान पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि तरुणीची सुरक्षित सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. बजरंग दलाचे शहर प्रमुख सूरज भगेवार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याला 'लव जिहाद' संबोधत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या पाच दिवसांच्या कालावधीत तरुणीसोबत काय झाले, याची सखोल चौकशी व्हावी आणि आरोपीच्या कुटुंबाने हे सर्व माहित असतानाही गप्प का राहिले, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

आरोपी पोलीस कोठडीत; पीडित तरुणीची रवानगी सरकारी सुधारगृहात

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. सध्या पीडित तरुणीला सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकारी रिमांड होममध्ये (सुधारगृह) ठेवण्यात आले आहे. आरोपी जमीर काजी याला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. हरियाणा पोलिसांना या प्रकरणाची रीतसर माहिती देण्यात आली असून, स्थानिक पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत. अकोल्यातील हिंदू संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवल्यामुळे पोलिसांनी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गेमिंग ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कधीकाळी 32 मतांनी निवडणूक जिंकून आमदार झाले, भाजपने विधानपरिषदेची संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत?