'प्रदेश त्यांचा, शहर त्यांचं..कुणाला खाज असेल त्यांनी यावं..' धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना खुले आव्हान

योगेश पांडे

29 Apr 2026 (अपडेटेड: 29 Apr 2026, 03:45 PM)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्रींना आव्हान देत 80 लाखांच बक्षीस जाहीर केलं होतं. त्याला आता धीरेंद्र शास्त्रींनी प्रत्युत्तर दिले आहे.

Bageshwar Baba on Shyam Manav

Bageshwar Baba on Shyam Manav

Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रदेश त्यांचा, शहर त्यांचं..

point

कुणाला खाज असेल त्यांनी यावं..

point

धीरेंद्र शास्त्रींचे नागपुरात ओपन चॅलेंज

Bageshwar Baba on Shyam Manav : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांना दैवी शक्ती सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. जर त्यांनी हे सिद्ध केलं तर त्यांना 80 लाखांचं बक्षीस देण्याचीही घोषणा केली होती. याला धीरेंद्र शास्त्री यांनी उत्तर दिले आहे. 'मी पाच दिवस इथे आहे, मध्य प्रदेशात नाही. रामकथा सुरू आहे. प्रदेश त्यांचा, मंच पण त्यांचा. कुणाला काही खाज असेल तर त्यांनी यावे' असे प्रतिआव्हान धीरेंद्रशास्त्रींनी दिले. याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. धीरेंद्र शास्त्री यांचा नागपूरातील रेशीमबागेत रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे.  

हे वाचलं का?

'कुणाला काही खाज असेल तर त्यांनी यावे'

धीरेंद्र शास्त्री श्याम मानव यांना आव्हान देत असतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, 'यावेळी मी नागपूरमध्येच आहे, मध्यप्रदेशात नाही. महाराष्ट्रातच आहे. एक तासासाठी नाही तर पाच दिवसांसाठी आहे. कथामंडप घालण्यात आलेला आहे. मंच तयार करण्यात आला आहे. प्रदेश त्यांचा, शहर त्यांचं, मंचही त्यांचा. मी एकटाच आहे. जर कुणाला काही खाज असेल तर उद्या दरबारात यावे. माझ्याकडे जी विद्या आहे, शक्ती आहे तिचे मी सादरीकरण करेन. मी जादूगार नाही. ईश्वर जी प्रेरणा देईल तेच मार्गदर्शन लोकांना करेन. ते आले तर त्यांनाही मार्गदर्शन करीन.' 

हे ही वाचा : दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा धक्का, किती मतांनी पराभूत? मस्साजोगच्या निवडणुकीत काय घडलं?

नंतर म्हणतील, बाबा पळाला

यापुढे बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, '30 तारखेपर्यंत मी इथेच आहे. नाहीतर नंतर म्हणतील बाबा पळाला. आणि अजून एक बातमी त्यांना द्या. पाचच दिवसांची कथा आहे, सात दिवसांची नाही हे त्यांना सांगा. एकदाच हे प्रकरण मिटवून टाकूया. माझ्या पाठीमागचाही त्रास संपेल आणि त्यांच्याही मागचा संपेल.'  

हे ही वाचा : पुण्यात भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, 16 राऊंड फायर केल्याने देहुरोड परिसरात दहशतीचं वातावरण

व्हायरल व्हिडिओनंतर श्याम मानव काय म्हणाले?

धीरेंद्र शास्त्री यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला मार्गदर्शन करणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही स्वत:ला शास्त्री म्हणवता, रामकथावाचक म्हणवता, खाज अशा शब्दांचा प्रयोग करता. ही तुमची संस्कृती आहे, ही तुमची योग्यता आहे. चमत्कार सिद्ध केल्यास 2023 मध्ये 30 लाख रुपयांचे बक्षीस होत ते आता 80 लाख रुपयाचं केलं आहे. पत्रकारांसमोर दहा लोकांना ओळखून आणि जवळच्या रूममध्ये ठेवलेल्या वस्तू ओळखायचा आहेत.  हे आव्हान 90 टक्के जरी पूर्ण केले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करू आणि आपले कायमस्वरूपी भक्त बनू.'