Pune News : पुणे जिल्ह्यातील एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्हावी या गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहे. एस. एन. कांबळे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. ही बाब समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सरकारी कर्मचाऱ्याने बायकोचे अश्लील फोटो आणि मोबाईल नंबर केले व्हायरल, त्याखाली रेटही लिहिला; धक्कादायक प्रकरण
टिळा लावून येण्यास विरोध
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची न्हावी या गावात न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापक एस. एन. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना टिळा लावून येण्यास विरोध केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच टिळा लावलेल्या विद्यार्थांना मुख्याध्यापक अपमानास्पद बोलल्याचा आरोपदेखील करण्यात आला. यामुळे जोरदार वाद होत असल्याचे पहायला मिळत आहे. यानंतर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते शाळेत पोहोचले आणि मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला.
हे ही वाचा : मुलीला भेटण्याच्या बहाण्याने निर्जन शेतात बोलावले, नंतर प्रियकरासह मित्रांनी आळीपाळीने... प्रियकरात जागा झाला राक्षस
मुख्याध्यापकांचे स्पष्टीकरण
यानंतर मुख्याध्यापकांनी यावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास कोणतेही बंध नाही. मात्र असा प्रकार पुन्हा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT











