Parliament Security Breach : लोकसभेत तरूणांच्या घुसखोरी दरम्यान राहुल गांधी कुठे होते?

प्रशांत गोमाणे

• 02:14 PM • 13 Dec 2023

खरं तर संसदेत चार जणांनी घुसखोरी केली होती. यामधील नीलम (42) आणि अमोल शिंदे (25) या दोघांनी संसदेच्या बाहेरील परीसरात गोंधळ घातला होता. त्याच दरम्यान इतर दोघे म्हणजेच सागर शर्मा आणि मनोरंजन या दोघांनी थेट लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरी गाठली होती.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Parliament Security Breach : संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान आज लोकसभेत मोठा गोंधळ उडाला होता. लोकसभेच्या कामकाजा दरम्यान अचानक दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकावर उड्या घेतल्या होत्या. यामधील एका तरूणांने त्यांच्या बुटातून स्प्रे काढत सभागृहात मारला होता. यानंतर त्याला खासदारांना ताब्यात घेतले होते. या संपूर्ण घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या घटने दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी नेमके कुठे होते ? आणि ते काय करत होते? हे जाणून घेऊयात. (parliament security breach two youth jumped into lok sabha and spread smoke where is rahul gandhi)

हे वाचलं का?

खरं तर संसदेत चार जणांनी घुसखोरी केली होती. यामधील नीलम (42) आणि अमोल शिंदे (25) या दोघांनी संसदेच्या बाहेरील परीसरात गोंधळ घातला होता. त्याच दरम्यान इतर दोघे म्हणजेच सागर शर्मा आणि मनोरंजन या दोघांनी थेट लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरी गाठली होती. या प्रेक्षक गॅलरीतून नंतर त्यांनी सभागृहातील खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या होत्या. यातील एका तरूणाने बाकावर उड्या मारल्यानंतर बुटातून स्प्रे काढून सभागृहात फवारला होता. त्यानंतर खासदारांनी मिळून त्याला ताब्यात घेतले.

हे ही वाचा : Sindhudurg Crime : 19 वर्षीय दीर 35 वर्षीय वहिनीसोबत भाड्याच्या खोलीत राहिला, नंतर…

अचानक सभागृहात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता आणि ते दहशतीच्या सावटाखाली होते. यावेळी राहुल गांधी देखील सभागृहात उपस्थित होते. राहुल गांधी यांच्याजवळ कार्ति चिदंबरम आणि इतर खासदार उभे आहेत. हे सर्वच खासदार सभागृहात नेमकं काय घडलंय, हे पाहतायत. यावेळी सभागृहात तो स्प्रेचा धुवा देखील पसरल्याचे फोटोत दिसतेय.

भाजपच्या खासदाराचा पास वापरून घुसखोरी

संसदेची सुरक्षाभेदून लोकसभेच्या सभागृहात उडी मारून दहशत माजवणाऱ्या तरुणांनी कर्नाटकाच्या म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाने विजिटर पास आणले होते, असा दावा बसपाचे निलंबित खासदार दानिश अली यांनी केला आहे. या दाव्यानंतर प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

हे ही वाचा : छमछम! पुणे-साताऱ्यातील डॉक्टरांचे तोकड्या कपड्यातील 4 तरुणींसोबत चाळे, नावे आली समोर

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सहा जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. यामधील चार जणांना अटक केली आहे. तर दोघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी आता विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात अजून काय उलगडा होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp